Australia Playing XI For Boxing Day Test : ऑस्ट्रेलियाने बॉक्सिंग डे कसोटीसाठी आपल्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉक्सिंग डे कसोटी गुरुवारपासून (२६ डिसेंबर) खेळवली जाणार आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीची ही चौथी कसोटी असेल. या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाने अतिशय इंटरेस्टिंग प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे.
कांगारूंच्या संघात १९ वर्षीय खेळाडूचाही समावेश करण्यात आला आहे. याशिवाय ट्रॅव्हिस हेड पूर्णपणे फिट आहे. पण गाब्बा कसोटीत विराट कोहलीला बाद करणारा जोश हेझलवूड संघाबाहेर आहे.
ऑस्ट्रेलियाने प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल केले आहेत. नॅथन मॅकस्विनीच्या जागी १९ वर्षीय सॅम कोन्स्टास याला प्लेइंग इलेव्हनचा भाग बनवण्यात आले आहे. मॅकस्विनी हा शेवटच्या दोन कसोटी सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघाचा भाग नाही.
जोश हेझलवूडच्या जागी स्कॉट बोलंडला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले आहे. बोलंडने ॲडलेडमध्ये पिंक बॉल कसोटी खेळली होती, ज्यामध्ये त्याने शानदार गोलंदाजी करत ५ बळी घेतले होते.
ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज आणि मालिकेतील सर्वाधिक धावा करणारा ट्रेव्हिड हेडला फिटनेसच्या बाबतीत ग्रीन सिग्नल मिळाला आहे. हेडने बॉक्सिंग डे कसोटीसाठी फिटनेस टेस्ट पास केली आहे. कर्णधार पॅट कमिन्सने पत्रकाराशी बोलताना सांगितले की, हेड मेलबर्न कसोटीसाठी पूर्णपणे तंदुरुस्त आहे.
हेडचा फिटनेस ऑस्ट्रेलियासाठी वरदान ठरेल आणि टीम इंडियासाठी मोठी समस्या असेल. हेडने मालिकेत सलग दोन शतके झळकावली आहेत. हेडने ॲडलेडमध्ये १४० आणि ब्रिस्बेनमध्ये १५२ धावांची शानदार खेळी खेळली होती.
बॉक्सिंग डे कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाची प्लेइंग इलेव्हन- उस्मान ख्वाजा, सॅम कोन्स्टॅन्स, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, स्कॉट बोलँड.
संबंधित बातम्या