Pakistan Cricket : पाकिस्तानसाठी वाईट बातमी, सामन्याच्या काही तासांपूर्वीच असं काय घडलं? पाहा
icc odi ranking pakistan : आशिया चषकात पाकिस्तानला भारताशी मुकाबला करायचा आहे. पण त्याआधी टीमसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. सामन्यापूर्वी पाकिस्तानचा संघ आपल्या सातत्याबद्दल आणि वनडे रँकिंगमध्ये नंबर वन असल्याचे बोलत होता. पण सामन्याच्या काही तास आधीच त्यांचे नंबर वनचे स्थान हिसकावण्यात आले आहे.
latest icc odi ranking : आशिया कप 2023 च्या सुपर 4 सामन्यात पाकिस्तानला भारताचा सामना करावा लागणार आहे. त्याआधी संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. त्यांचे वनडे रँकिंगमधील नंबर वनचे स्थान ऑस्ट्रेलियाने हिसकावले आहे.
ट्रेंडिंग न्यूज
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिले दोन सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले आहेत. यासह कांगारू संघाने पाकिस्तानला मागे टाकत आयसीसी वनडे क्रमवारीत पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले आहे. डेव्हिड वॉर्नर आणि मार्नस लॅबुशेन यांच्या शतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात १२३ धावांनी मोठा विजय नोंदवला. पहिला सामना ऑस्ट्रेलियाने ३ विकेट्सने जिंकला होता.
दरम्यान, पाकिस्तान संघासोबतच त्यांचे माजी क्रिकेटपटूही संघ नंबर वन असल्याबद्दल सतत बोलत होते. पण आता त्यांचे नंबर वनचे स्थान गेले आहे. ते दोन नंबरवर आले आहेत.
पाकिस्तान एका गुणाने मागे पडला
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातील विजयासह ऑस्ट्रेलियाचे एकूण १२१ रेटिंग गुण झाले आहेत आणि त्यांनी पाकिस्तानला एक रेटिंग पॉइंट मागे ठेवले आहे. ICC क्रमवारीत भारत ११४ रेटिंग गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
ऑस्ट्रेलियाने गेल्या वर्षी चढ-उताराच्या मोहिमेनंतर एकदिवसीय क्रमवारीत आपले अव्वल स्थान गमावले होते. त्यांना २०२२ मध्ये श्रीलंकेविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते आणि त्यानंतर त्यांचा झिम्बाब्वेकडूनही एका सामन्यात पराभव झाला होता. तथापि, त्यानंतर ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंड आणि इंग्लंडचा ३-० च्या समान फरकाने पराभव केला.
भरपूर वनडे सामने होणार असल्याने क्रमवारी बदलत राहणार
यानंतर, मार्च २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला भारतात पराभूत केले आणि आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धचे पहिले दोन सामने जिंकले आहेत. पाकिस्तान सध्या आशिया कपमध्ये खेळत आहे आणि अशा स्थितीत समीकरणे बदलू शकतात. ऑस्ट्रेलियालाही दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३ एकदिवसीय सामने खेळायचे आहेत. अशा स्थितीत क्रमवारीत वारंवार बदल होताना दिसू शकतात.