ऑस्ट्रेलियाच्या ड्रेसिंग रूमबाबत अफवा पसरवणाऱ्या काही समालोचकांवर कर्णधार पॅट कमिन्सने टीका केली आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याला भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत ड्रेसिंग रूममधील कथित मतभेदांबाबत अनेक प्रश्न विचारण्यात आले, ज्याला कमिन्सने चांगले उत्तर दिले.
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड दुखापतीमुळे पुढील कसोटीतून बाहेर पडला आहे. पण यावर माजी क्रिकेटपटूंचे म्हणणे आहे की, तो संघातील राजकारणाचा बळी ठरला आहे.
अॅडम गिलख्रिस्ट आणि सुनील गावस्कर यांच्यासह भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेतील समालोचकांनी पर्थ कसोटीच्या तिसऱ्या दिवशी जोश हेझलवूड याच्या वक्तव्याचा संदर्भ दिला, ज्यात त्याने पर्थ कसोटीतील संघाच्या खराब कामगिरीसाठी फलंदाजांना जबाबदार धरले.
जोश हेझलवूडने पत्रकारांना संघाच्या पराभवावर ऑस्ट्रेलियन फलंदाजांना प्रश्न विचारण्यास सांगितले होते. माजी क्रिकेटपटू अॅडम गिलख्रिस्टला हेझलवूडच्या या वक्तव्याने आश्चर्य वाटले, तर सुनील गावस्कर यांनीही यावर प्रतिक्रिया देत ऑस्ट्रेलियाच्या ड्रेसिंग रुममध्ये फूट पडल्याचे म्हटले आहे.
यावर पत्रकार परिषदेत कमिन्स म्हणाला की, अनेक समालोचकांनी हेझलवूडच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावून चर्चेत येण्याचा प्रयत्न केला.
पॅट कमिन्स म्हणाला, 'संघ खूप चांगला आहे. पण काही टीकाकारांनी याबाबत शंभर टक्के चुकीचा समज करून घेतला. आम्ही नेहमीप्रमाणे तयारी करतो. संघात खूप चांगले वातावरण आहे. जेव्हा गोष्टी व्यवस्थित होत नाहीत, तेव्हा बरेच टीकाकार आपल्याला पाठिंबा देतात, परंतु काही असे असतात जे हेडलाइन बनवण्याचा प्रयत्न करतात.
आपण त्या गोष्टींकडे लक्ष न देण्याचा प्रयत्न करतो. आम्ही कशी तयारी करतो यावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करतो, स्वत: ला सामना जिंकण्याची सर्वोत्तम संधी देतो. "
संबंधित बातम्या