ऑस्ट्रेलियन क्रिकेटर मिचेल स्टार्कने आपल्या कारकिर्दीत अनेक मोठे विक्रम केले आहेत. त्याने ऑस्ट्रेलियासाठी अनेकदा मॅच विनिंग परफॉर्मन्स दिला आहे. स्टार्कच्या नावावर दोन वनडे वर्ल्डकप, एक टी-20 वर्ल्डकप आणि एक वर्ल्ड चॅम्पियनशीपदेखील आहे.
मिचेल स्टार्क आज (३० जानेवारी) त्याचा ३४ वा वाढदिवस साजरा करत आहे. स्टार्कने टीम इंडियाविरुद्ध वनडे पदार्पणाचा सामना खेळला होता. त्यानंतर त्याने अनेकदा भारताला पराभवाचे धक्के दिले आहेत.
मिचेलस स्टार्कने २०१० मध्ये विशाखापट्टणम येथे आपल्या करिअरचा पहिला वनडे सामना खेळला होता. त्या सामन्यात त्याला एकही विकेट मिळाली नव्हती. पण तो आता क्रिकेट जगतातील सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक आहे,
स्टार्कच्या एकूण कारकिर्दीवर नजर टाकली तर तो खूपच यशस्वी वेगवान गोलंदाज आहे. त्याने आतापर्यंत ८७ कसोटी सामन्यांमध्ये ३५३ विकेट्स घेतल्या आहेत. ५० धावांत ६ विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. तसेच, स्टार्कने १२१ एकदिवसीय सामन्यात २३६ विकेट घेतल्या आहेत. या काळात २८ धावांत ६ बळी घेणे ही त्याची वनडेतील सर्वोत्तम कामगिरी आहे. सोबतच स्टार्कने टी-20 फॉरमॅटमध्येही चांगली कामगिरी केली आहे. त्याने ५८ टी-20 सामन्यात ७३ विकेट घेतल्या आहेत. स्टार्कच्या पदार्पणाला जवळपास १४ वर्षे झाली आहेत.
मिचेल स्टार्कने २०२३ च्या वनडे विश्वचषकात चांगली कामगिरी केली होती. वर्ल्ड कपमध्ये स्टार्कने एकूण १६ विकेट घेतल्या होत्या. यापूर्वी २०१९ वर्ल्डकपमध्ये २७ बळी घेतले होते. तर २०१५ च्या वर्ल्ड कपमध्ये स्टार्कने २२ विकेट घेतल्या होत्या.