Australia Team For New Zealand T20 Series : न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन टी-20 सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने आपला १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. टी-20 वर्ल्डकपपूर्वी ऑस्ट्रेलियाची ही शेवटची टी-20 मालिका असणार आहे.
त्यामुळे ही मालिका ऑस्ट्रेलियासाठी अत्यंत महत्वाची असेल आणि या मालिकेतील बहुतेक खेळाडू आगामी टी-20 वर्ल्डकपमध्ये खेळताना दिसतील.
न्यूझीलंडविरुद्धच्या या मालिकेसाठी मिचेल मार्शची संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. टी-20 विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क आणि स्टीव्ह स्मिथसारखे दिग्गज ऑस्ट्रेलियन संघात परतले आहेत.
टी-20 वर्ल्डकप जूनमध्ये खेळला जाणार आहे. या वर्ल्डकपपूर्वी ऑस्ट्रेलियाची ही शेवटची टी-20 मालिका असणार आहे. कारण या मालिकेनंतर खेळाडू इंडियन प्रीमियर लीगमध्ये व्यस्त होतील. यानंतर सर्व संघ विश्वचषकाच्या तयारीला लागतील.
याआधी स्टीव्ह स्मिथला वेस्ट इंडिजविरुद्धच्या होम टी-20 मालिकेत विश्रांती देण्यात आली होती. तर पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्क यांनी २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियासाठी शेवटचा टी-20 सामना खेळला होता. अशा परिस्थितीत टी-२० विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून पुन्हा एकदा या दोन खेळाडूंचा संघात समावेश करण्यात आला आहे.
यासोबतच न्यूझीलंड दौऱ्यावरील टी-20 मालिकेसाठी डेव्हिड वॉर्नर आणि मॅथ्यू शॉर्ट यांचाही संघात समावेश करण्यात आला आहे. याशिवाय नॅथन एलिस, जोश इंग्लिश आणि मार्कस स्टॉइनिस यांनाही संघात संधी देण्यात आली आहे.
तसेच, टी-20 संघात ग्लेन मॅक्सवेल, टीम डेव्हिड आणि मॅथ्यू वेड यांचाही समावेश आहे.
न्यूझीलंड दौऱ्यावरील ऑस्ट्रेलियाचा टी-20 संघ- मिचेल मार्श (कर्णधार), पॅट कमिन्स, टीम डेव्हिड, नॅथन एलिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, मॅट शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर, ॲडम झाम्पा .