IND vs AUS : भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियन संघ जाहीर, सर्व स्टार खेळाडू खेळणार, वर्ल्डकपआधी रंगणार थरार
Australia ODI Squad for India tour : आगामी एकदिवसीय विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ भारताविरुद्ध ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कांगारूंचा संघ जाहीर केला आहे. पहिला वनडे २२ सप्टेंबर रोजी होणार आहे.
Australia ODI Squad Against India : आगामी एकदिवसीय विश्वचषकापूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कांगारूंचा संघ जाहीर केला आहे. यात स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क आणि ग्लेन मॅक्सवेलसह कर्णधार पॅट कमिन्सचे पुनरागमन झाले आहे.
ट्रेंडिंग न्यूज
विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियन संघ मेगा स्पर्धेच्या तयारीची चाचपणी करण्याच्या उद्देशाने या मालिकेत खेळेल. भारत-ऑस्ट्रेलिया वनडे मालिका २२ सप्टेंबरपासून खेळवली जाणार आहे,
स्टीव्ह स्मिथ-कमिन्स खेळणार
ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स अॅशेस मालिकेत दुखापत झाल्यामुळे दक्षिण आफ्रिकेतील एकदिवसीय मालिकेत भाग घेऊ शकला नाही. याशिवाय स्टीव्ह स्मिथ आणि ग्लेन मॅक्सवेल हे देखील दुखापतींमुळे या मालिकेत सहभागी होऊ शकले नाहीत. आता हे तिन्ही खेळाडू पूर्णपणे तंदुरुस्त असून पुनरागमन करणार आहेत.
भारतीय खेळपट्ट्या लक्षात घेऊन ऑस्ट्रेलियाने आपल्या संघात दोन विशेषज्ञ फिरकी गोलंदाजांचाही समावेश केला आहे, त्यापैकी एक अॅडम झम्पा आणि दुसरा तनवीर संघा आहे. याशिवाय ग्लेन मॅक्सवेल हा संघाचा तिसरा फिरकी गोलंदाजही पर्याय म्हणून असेल.
स्पेन्सर आणि लॅबुशेन यांनाही स्थान मिळाले
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत चमकदार कामगिरी करणाऱ्या मार्नस लॅबुशेनचा भारताविरुद्धच्या मालिकेसाठी संघात समावेश करण्यात आला आहे. मिचेल स्टार्कशिवाय कर्णधार पॅट कमिन्स, शॉन अॅबॉट, जोश हेझलवूड आणि स्पेन्सर जॉन्सन यांनाही वेगवान गोलंदाजीत स्थान देण्यात आले आहे.
दोन्ही संघांमधील मालिकेतील पहिला वनडे सामना २२ सप्टेंबर रोजी मोहालीच्या मैदानावर खेळवला जाईल. यानंतर दुसरा आणि तिसरा वनडे सामना २४ आणि २७ सप्टेंबरला इंदूर आणि राजकोटच्या मैदानावर खेळवला जाईल.
भारताविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ :
पॅट कमिन्स (कर्णधार), शॉन अॅबॉट, अॅलेक्स कॅरी, नॅथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, जोश इंग्लिश, स्पेन्सर जॉन्सन, मार्नस लॅबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर संघा, मॅथ्यू शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस , डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा.