मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  AUS vs WI ODI : ऑस्ट्रेलियाने इतिहास रचला, वनडे सामना अवघ्या ७ षटकात संपवला, वेस्ट इंडिजचा धुव्वा

AUS vs WI ODI : ऑस्ट्रेलियाने इतिहास रचला, वनडे सामना अवघ्या ७ षटकात संपवला, वेस्ट इंडिजचा धुव्वा

Feb 06, 2024 02:02 PM IST

AUS vs WI 3rd ODI : ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातही वेस्ट इंडिजचा वाईट पद्धतीने पराभव केला. कांगारूंनी तिसरा एकदिवसीय सामना २५९ चेंडू शिल्लक असताना जिंकला. स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांची वनडे मालिका 3-0 अशी जिंकली.

AUS vs WI 3rd ODI
AUS vs WI 3rd ODI (AFP)

Australia vs West Indies 3rd ODI : वेस्ट इंडिजचा संघ दोन कसोटी, तीन वनडे आणि तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. वेस्ट इंडिजने दोन कसोटी सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली. पण एकदिवसीय मालिकेत त्यांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. 

ऑस्ट्रेलियाने वनडे मालिका ३-० ने जिंकली आहे. या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना कॅनबेरा येथे खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ऐतिहासिक विजय मिळवला.

कॅनबेरा वनडे सामन्यात वेस्ट इंडिजचा संघ प्रथम फलंदाजीला आला आणि २४.१ षटकांत अवघ्या ८६ धावांत गारद झाला. ऑस्ट्रेलियासाठी झेवियर बार्टलेट हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. या सामन्यात त्याने ४ विकेट्स घेतल्या. त्याचवेळी ॲडम झाम्पा आणि लान्स मॉरिसने २-२ विकेट घेतल्या. यानंतर ऑस्ट्रेलियाने ८७ धावांचे लक्ष्य केवळ २ गडी गमावून पूर्ण केले.

ट्रेंडिंग न्यूज

ऑस्ट्रेलियाकडून जेक फ्रेझर-मॅकगर्कने १८ चेंडूंत ५ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ४१ धावा केल्या. तर जोश इंग्लिशने १६ चेंडूत नाबाद ३५ धावा केल्या. इंग्लिशने ४ चौकार आणि १ षटकार मारला.

ऑस्ट्रेलियाने केवळ ६.५ षटकांत ८७ धावांचे लक्ष्य गाठले आणि २५९ चेंडू राखून हा सामना जिंकला. यानंतर ऑस्ट्रेलियाच्या नावावर एक विक्रम झाला आहे. सर्वाधिक चेंडू शिल्लक ठेवून वनडे सामना जिंकणाऱ्या संघांमध्ये ऑस्ट्रेलिया समावेश झाला आहे.

यापूर्वी सप्टेंबर २००४ मध्ये ऑस्ट्रेलियाने २५३ चेंडू शिल्लक ठेवून अमेरिकेचा पराभव केला होता. त्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने केवळ ७.५ षटकांत ६६ धावांचे लक्ष्य पार केले होते.

एकदिवसीय क्रिकेटमधील सातवा सर्वात मोठा विजय

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक चेंडू शिल्लक ठेवून सामना जिंकण्याचा विक्रम इंग्लंडच्या नावावर आहे. इंग्लंडने १९७९  मध्ये २७७ चेंडू शिल्लक असताना कॅनडाचा पराभव केला होता. या सामन्यात इंग्लंडने १३.५ षटकात ४६ धावांचे लक्ष्य गाठले होते. पण तो एकदिवसीय सामना ६० षटकांचा होता. त्याचवेळी, आता सर्वाधिक चेंडू राखून सामना जिंकण्याच्या बाबतीत ऑस्ट्रेलिया सातव्या नंबर आला आहे.

वनडेतील सर्वात मोठे विजय (चेंडू शिल्लक ठेवून)

इंग्लंड विरुद्ध कॅनडा २७७ चेंडू

श्रीलंका विरुद्ध झिम्बाब्वे २७४ चेंडू

श्रीलंका विरुद्ध कॅनडा २७२ चेंडू

नेपाळ वि यूएसए २६८ चेंडू

न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश २६४ चेंडू

भारत विरुद्ध श्रीलंका २६३ चेंडू

ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज २५९ चेंडू

WhatsApp channel