मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Glenn Maxwell : ग्लेन मॅक्सवेलला दारू जास्ती झाली, मद्यधुंद अवस्थेत रुग्णालयात दाखल करावं लागलं

Glenn Maxwell : ग्लेन मॅक्सवेलला दारू जास्ती झाली, मद्यधुंद अवस्थेत रुग्णालयात दाखल करावं लागलं

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 22, 2024 05:34 PM IST

Glenn Maxwell : अ‍ॅडलेड शहरात रात्री उशिरापर्यंत पार्टी केल्यानंतर मॅक्सवेलला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण मॅक्सवेल जास्त काळ रुग्णालयात राहिला नाही.

Glenn Maxwell
Glenn Maxwell (PTI)

ऑस्ट्रेलियन संघ सध्या वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेनंतर एकदिवसीय आणि टी-20 मालिका खेळली जाणार आहे. पण अशातच, ऑस्ट्रेलियाच्या एका स्टार खेळाडूला रुग्णालयात दाखल करण्यात आले. या खेळाडूने अति मद्यपान केल्याचे समोर आले आहे.  हा खेळाडू दुसरा कोणी नसून ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल आहे. 

ऑस्ट्रेलियन मीडियानुसार, अ‍ॅडलेड शहरात रात्री उशिरापर्यंत पार्टी केल्यानंतर मॅक्सवेलला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण मॅक्सवेल जास्त काळ रुग्णालयात राहिला नाही. त्याने आता ९ फेब्रुवारीपासून वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी रिहॅब सुरू केले आहे.

म्यूझिक कॉन्सर्टला मॅक्सवेलची हजेरी

ग्लेन मॅक्सवेल अ‍ॅडलेडमधील एका म्यूझिक कार्यक्रमात मद्यपान करत होता. यानंतर त्याला रुग्णवाहिकेने रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्याच्यावर उपचार करण्यात आले. मॅक्सवेलला नेमके काय झाले होते, याची नेमकी माहिती अद्याप मिळालेली नाही. 

विशेष म्हणजे, या कॉन्सर्टला ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजच्या कसोटी खेळाडूंनीही कॉन्सर्टला हजेरी लावली होती. परंतु मॅक्सवेल त्यांच्यासोबत परत आला नाही.

वनडेत विश्रांती, टी-20 मालिका खेळणार

दरम्यान, वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिका २ ते ६ फेब्रुवारीदरम्यान खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या १३ सदस्यीय संघात मॅक्सवेलचा समावेश करण्यात आलेला नाही. वर्कलोड कमी करण्यासाठी मॅक्सवेलला विश्रांती देण्यात आल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सांगितले. पण तो ९ फेब्रुवारीपासून टी-20 मालिका खेळणार आहे.

मॅक्सवेलशिवाय वनडे मालिकेतून पॅट कमिन्स, मिच मार्श, मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूड यांनाही विश्रांती देण्यात आली आहे.

मॅक्सवेल दुखापंतीमुळे त्रस्त

ग्लेन मॅक्सवेलला २०२३ या वर्षात बऱ्याचदा दुखापतींचा सामना करावा लागला. पण त्याने वनडे वर्ल्डकप पूर्ण खेळला आणि स्पर्धेत मोलाची कामगिरी केली. वर्ल्डकपदरम्यान मॅक्सवेल अहमदाबादेत गोल्फ खेळताना पडला होता. त्यावेळी त्याच्या चेहऱ्याला दुखापत झाली होती. यानंतर त्याला वर्ल्डकपमधील इंग्लंडविरुद्धच्या सामन्याला मुकावे लागले होते.

WhatsApp channel
For latest Cricket News Live Score stay connected with HT Marathi