महिला टी-20 विश्वचषक २०२४ चा पहिला उपांत्य सामना ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला जात आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर ऑस्ट्रेलियाने २० षटकांत ५ बाद १३४ धावा केल्या आहेत. आफ्रिकेला विजयासाठी १३५ धावा कराव्या लागणार आहेत.
ऑस्ट्रेलियाकडून बेथ मुनीने सर्वाधिक ४४ धावा केल्या. तर दक्षिण आफ्रिकेकडून अयाबोंगा खाका हिने २ बळी घेतले. मारिजन कॅप आणि नॉनकुलुलेको मलाबा यांनी १-१ बळी मिळवला. बेथ मुनी १७व्या षटकात धावबाद झाली.
तर शेवटी एलिस पेरी आणि फिबी लिचफिल्ड यांनी वादळी फलंदाजी केली. त्यांच्यामुळेच ऑस्ट्रेलियाने १३४ धावांपर्यंत मजल मारली. पेरीने २३ चेंडूत ३१ तर लिचफिल्डने ६ चेंडूत १६ धावा फटकावल्या.
विशेष म्हणजे, २०२३ च्या टी-20 वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिका यांच्यात फायनल झाली होती. त्यावेळी ऑस्ट्रेलियाने आफ्रिकेचा १९ धावांनी पराभव केला होता. आता त्या पराभवाचा बदला घेण्याची सुवर्णसंधी आफ्रिकेकडे आहे.
या वर्ल्डकपचा दुसरा उपांत्य सामना १८ ऑक्टोबर रोजी न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात होणार आहे.
दोन्ही प्लेइंग इलेव्हन-
ऑस्ट्रेलिया- ग्रेस हॅरिस, बेथ मुनी (विकेटकीपर), जॉर्जिया वेअरहॅम, ताहलिया मॅकग्रा (कर्णधार), एलिस पेरी, ऍशलेग गार्डनर, फोबी लिचफिल्ड, ॲनाबेल सदरलँड, सोफी मोलिनक्स, मेगन शुट, डार्सी ब्राउन.
दक्षिण आफ्रिका- लॉरा वोल्वार्ड (कर्णधार), तझमिन ब्रिट्स, अनेके बॉश, मारिझान कॅप, क्लो ट्रायॉन, सुने लुस, नादिन डी क्लर्क, ॲनेरी डेर्कसेन, सिनालो जाफ्ता (विकेटकीपर), नॉनकुलुलेउको म्लाबा, अयाबोंगा खाका