मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Babar Azam : बाबर आझम ऑस्ट्रेलियात सुपर फ्लॉप, संपूर्ण मालिकेत अर्धशतकही करता आलं नाही

Babar Azam : बाबर आझम ऑस्ट्रेलियात सुपर फ्लॉप, संपूर्ण मालिकेत अर्धशतकही करता आलं नाही

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 05, 2024 03:49 PM IST

AUS vs PAK Babar Azam : पाकिस्तानी फलंदाजांनी या संपूर्ण मालिकेत निराशाजनक कामगिरी केली. बाबर आझमकडून चाहत्यांना सर्वात जास्त अपेक्षा होता पण तो या मालिकेत एकही अर्धशतक करू शकला नाही.

AUS vs PAK Babar Azam
AUS vs PAK Babar Azam (AFP)

Babar Azam Stats Australia vs Pakistan :  ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात ३ कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. मालिकेतील शेवटचा सामना सिडनी येथे खेळला जात आहे. आज (५ जानेवारी) सामन्याच्या तिसऱ्या दिवसअखेर पाकिस्तानने दुसऱ्या डावात ७ बाद ६८ धावा केल्या आहेत. पाकिस्तानकडे पहिल्या डावाच्या आधारे ८२ धावांची आघाडी झाली आहे.

सिडने कसोटीत पाकिस्तानचा कर्णधार शान मसूदने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद २९९ धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा पहिला डाव ३१३ धावांवर आटोपला. अशाप्रकारे आता पाकिस्तानने दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवसअखेर ८२ धावांची आघाडी घेतली आहे.

दरम्यान, ही कसोटी मालिका पाकिस्तानने आधीच गमावली आहे. ऑस्ट्रेलियान मालिकेत २-१ ने आघाडीवर आहे. पाकिस्तानी फलंदाजांनी या संपूर्ण मालिकेत निराशाजनक कामगिरी केली. बाबर आझमकडून चाहत्यांना सर्वात जास्त अपेक्षा होता पण तो या मालिकेत एकही अर्धशतक करू शकला नाही.

बाबरला एक अर्धशतकही करता आले नाही

बाबरला या मालिकेतील ६ डावात एकही अर्धशतक झळकावता आले नाही. या मालिकेत त्याने केवळ १२६ धावा केल्या. या मालिकेत बाबरची सर्वोत्तम धावसंख्या ४१ धावा आहे.

पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना पर्थमध्ये खेळला गेला. या सामन्याच्या पहिल्या डावात बाबर ५४ चेंडूत २१ धावा करून बाद झाला. यानंतर दुसऱ्या डावात त्याने ३७ चेंडूत १४ धावा केल्या. 

मालिकेतील दुसरा सामना मेलबर्न येथे खेळला गेला. या कसोटीच्या पहिल्या डावात बाबर केवळ १ धावा काढून बाद झाला. तर दुसऱ्या डावात तो ४१ धावा करून बाद झाला.

या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला होता. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने त्यांचा ३६० धावांनी पराभव केल. तर दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानला ७९ धावांनी पराभव पत्करावा लागला. 

बाबरचा एकूण रेकॉर्ड चांगला

आता तिसरा सामना खेळवला जात आहे. या सामन्यातही बाबर काही विशेष करू शकला नाही. सिडनी येथे खेळल्या जात असलेल्या कसोटीच्या पहिल्या डावात तो ४० चेंडूंचा सामना करत २६ धावा करून बाद झाला. बाबरच्या या खेळीत ४ चौकारांचा समावेश होता. दुसऱ्या डावातही तो केवळ २३ धावा करून बाद झाला. अशाप्रकारे बाबरला संपूर्ण मालिकेत एकही अर्धशतक झळकावता आले नाही.

बाबर आझमचा एकूण कसोटी रेकॉर्ड चांगला आहे. त्याने ५१ कसोटी सामन्यांमध्ये ३८४९ धावा केल्या आहेत. यात त्याने ९ शतके आणि २६ अर्धशतके केली आहेत. बाबरची सर्वोत्तम कसोटी धावसंख्या १९६ धावा आहे.

WhatsApp channel