AUS vs IND 1st Day 2 Perth Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना २२ नोव्हेंबरपासून पर्थ येथे खेळला जात आहे. आज (२३ नोव्हेंबर) या सामन्याचा दुसरा दिवस आहे. या सामन्यात भारतीय संघ पहिल्या डावात १५० धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा संघ १०४ धावांत गारद झाले. यानंतर भारताला पहिल्या डावात ४६ धावांची मौल्यवान आघाडी मिळाली आहे.
ऑस्ट्रेलियाची शेवटची विकेट मिचेल स्टार्कच्या रूपात पडली, तो ११२ चेंडूत २६ धावा करून हर्षित राणाच्या चेंडूवर ऋषभ पंतकरवी झेलबाद झाला.
भारताकडून पहिल्या डावात जसप्रीत बुमराहने ३० धावांत सर्वाधिक ५ बळी घेतले. हर्षित राणाला ३, तर मोहम्मद सिराजला दोन विकेट मिळाले.
ऑस्ट्रेलियाने आज दुसऱ्या दिवसाची सुरुवात ६७/७ अशी केली. दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाला आठवा धक्का देत कर्णधार जसप्रीत बुमराहने आपला 'पंजा' पूर्ण केला. अपेक्षेप्रमाणे वेगवान गोलंदाजांनी ऑप्टस स्टेडियमच्या खेळपट्टीवर वर्चस्व गाजवले.
नॅथन लियॉन ५(१६) हर्षित राणाने बाद केल्याने कांगारूंची धावसंख्या ९ बाद ७९ अशी झाली. पण येथून शेवटच्या विकेटसाठी मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूड यांच्यात डावातील २५ धावांची सर्वात मोठी भागीदारी झाली.
ऑस्ट्रेलिया- उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, जोश हेझलवूड.
भारत- केएल राहुल, यशस्वी जैस्वाल, देवदत्त पडिक्कल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल, नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह (कर्णधार), मोहम्मद सिराज.