मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  AUS Vs ENG : ऑस्ट्रेलियानं उभारली या वर्ल्डकपमधील सर्वात मोठी धावसंख्या, इंग्लंडसमोर धावांचा डोंगर

AUS Vs ENG : ऑस्ट्रेलियानं उभारली या वर्ल्डकपमधील सर्वात मोठी धावसंख्या, इंग्लंडसमोर धावांचा डोंगर

Jun 09, 2024 12:22 AM IST

AUS Vs ENG Scorecard : टी-20 वर्ल्डकप २०२४ चा १७वा सामना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात खेळला जात आहे. दोन्ही संघ बार्बाडोसच्या केन्सिंग्टन ओव्हल येथे आमनेसामने आहेत.

AUS Vs ENG T20 World Cup 2024 Scorecard
AUS Vs ENG T20 World Cup 2024 Scorecard (PTI)

AUS Vs ENG T20 World Cup 2024 : टी-20 वर्ल्डकप २०२४ चा १७वा सामना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात खेळला जात आहे. बार्बाडोसच्या केन्सिंग्टन ओव्हल स्टेडियमवर इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पण हा निर्णय इंग्लंडच्या अंगलट आला.

ट्रेंडिंग न्यूज

कारण ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर ट्रॅव्हिस हेड आणि डेव्हिड वॉर्नर यांनी ५ षटकात ७१ धावा ठोकल्या. पण दोघेही पॉवरप्ले संपण्याच्या आतच बाद झाले.

पण शेवटी ऑस्ट्रेलियाने २० षटकात ७ बाद २०१ धावांपर्यंत मजल मारली. इंग्लंडला विजयासाठी २० षटकात २०२ धावांचे लक्ष्य आहे.

तत्पूर्वी, सलामीवीर हेड १८ चेंडूत ३४ धावा करून बाद झाला तर डेव्हिड वॉर्नर १६ चेंडूत ३९ धावा करून बाद झाला. हेडने २ चौकार आणि ३ षटकार मारले, तर वॉर्नरने २ चौकार आणि ४ षटकार मारले. 

हेडला आर्चरने तर वॉर्नरला मोईन अलीने क्लीन बोल्ड केले. यानंतर कर्णधार मिचेल मार्श आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्यात ६५ धावांची भागीदारी झाली. ही भागीदारी लियाम लिव्हिंगस्टोनने मोडली. त्याने मार्शला बाद केले.

मार्शने २५ चेंडूंत २चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ३५ धावांची खेळी केली. तर आदिल रशीदने मॅक्सवेलला सॉल्टकरवी झेलबाद केले. तो २५ चेंडूंत ३ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने २८ धावा करून बाद झाला. ऑस्ट्रेलियन संघाला १६८ धावांवर पाचवा धक्का बसला.

ख्रिस जॉर्डनने टिम डेव्हिडला लिव्हिंगस्टोनकरवी झेलबाद केले. त्याला ११ धावा करता आल्या. स्टॉइनिसने १७ चेंडूंत २ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ३० धावांची खेळी केली. जॉर्डनने त्याला तंबूत पाठवले. जॉर्डनची टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधली ही १००वी विकेट होती. शेवटी मॅथ्यू वेड १० चेंडूंत ३ चौकारांच्या मदतीने १७ धावा नाबाद राहिला.

इंग्लंडच्या गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर ख्रिस जॉर्डनने सर्वाधिक २ बळी घेतले. याशिवाय मोईन अली, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाला.

दोन्ही प्लेइंग इलेव्हन

ऑस्ट्रेलिया : डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, ॲडम झम्पा, जोश हेझलवूड.

इंग्लंड: जोस बटलर (विकेटकीपर/कर्णधार), फिलिप सॉल्ट, विल जॅक, जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रूक, मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन, ख्रिस जॉर्डन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वुड.

टी-२० वर्ल्डकप २०२४