Athiya Shetty KL Rahul : अथिया शेट्टी आणि केएल राहुल होणार आई-बाबा, बाळाचा जन्म कधी होणार? इन्स्टा पोस्ट करून सांगितलं
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Athiya Shetty KL Rahul : अथिया शेट्टी आणि केएल राहुल होणार आई-बाबा, बाळाचा जन्म कधी होणार? इन्स्टा पोस्ट करून सांगितलं

Athiya Shetty KL Rahul : अथिया शेट्टी आणि केएल राहुल होणार आई-बाबा, बाळाचा जन्म कधी होणार? इन्स्टा पोस्ट करून सांगितलं

Nov 08, 2024 06:50 PM IST

KL Rahul Athiya Shetty : टीम इंडियाचा खेळाडू केएल राहुल लवकरच बाप होणार आहे. त्याने स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना ही माहिती दिली.

Athiya Shetty KL Rahul : अथिया शेट्टी आणि केएल होणार आई-बाबा, ‘या’ महिन्यात देणार बाळाला जन्म
Athiya Shetty KL Rahul : अथिया शेट्टी आणि केएल होणार आई-बाबा, ‘या’ महिन्यात देणार बाळाला जन्म

टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज केएल राहुल बाप बनणार आहे. त्याची पत्नी अथिया शेट्टी बाळाला जन्म देणार आहे. खुद्द राहुलने ही माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली आहे. राहुलने सांगितले की, बाळाचा जन्म २०२५ मध्ये होईल. यानंतर आता सोशल मीडियावर चाहते केएल राहुलचे अभिनंदन करत आहेत.

अनेक सेलिब्रिटींनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. राहुल सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. तो बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी टीम इंडियाचा भाग आहे.

खरंतर राहुलने शुक्रवारी (८ नोव्हेंबर) संध्याकाळी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. याद्वारे त्याने सांगितले की अथिया आई होणार आहे आणि ती २०२५ मध्ये बाळाला जन्म देणार आहे. राहुल आणि अथियाचे २०२३ मध्ये लग्न झाले होते. या दोघांच्या लग्नाची खूप चर्चा झाली होती. राहुल आणि अथियाच्या जवळच्या मित्रांनाच त्यांच्या लग्नात आमंत्रित करण्यात आले होते. आता अथिया आई होणार आहे.

केएल राहुल सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर -

केएल राहुल सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. तो मेलबर्न येथे भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ यांच्यातील अनधिकृत कसोटीचा भाग आहे. या सामन्यात राहुल काही विशेष करू शकला नाही. सलामीवीर म्हणून तो पहिल्या डावात ४ धावा करून बाद झाला. तर दुसऱ्या डावात केवळ १० धावा करून तो बाद झाला.

याआधी न्यूझीलंडविरुद्धही राहुलला विशेष काही करता आले नव्हते. राहुल भारत-ऑस्ट्रेलिया बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेचाही भाग आहे.

राहुल खराब फॉर्मशी झुंजतोय

केएल राहुल सध्या खराब फॉर्मशी झुंजत आहे. त्यामुळे त्यांना टीकेलाही सामोरे जावे लागले. राहुल अलीकडेच ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध विशेष काही करू शकला नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या बंगळुरू कसोटीच्या एका डावात तो शून्यावर बाद झाला होता. त दुसऱ्या डावात १२ धावा करून तो बाद झाला. त्यानंतर त्याला दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीतून बाहेर काढण्यात आले होते.

Whats_app_banner