Rohit Sharma : रोहित शर्माचा फ्लॉप शो सुरूच, अनुष्का-अथियाची रिअ‍ॅक्शन सर्वकाही सांगून गेली
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Rohit Sharma : रोहित शर्माचा फ्लॉप शो सुरूच, अनुष्का-अथियाची रिअ‍ॅक्शन सर्वकाही सांगून गेली

Rohit Sharma : रोहित शर्माचा फ्लॉप शो सुरूच, अनुष्का-अथियाची रिअ‍ॅक्शन सर्वकाही सांगून गेली

Dec 30, 2024 09:49 AM IST

IND VS AUS TEST : भारतीय कर्णधार रोहित शर्माचा फ्लॉप शो कायम आहे. मेलबर्न कसोटीच्या दुसऱ्या डावात तो ९ धावांवर बाद झाला. हिटमॅन बाद झाल्यानंतर विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा आणि केएल राहुलची पत्नी अथिया शेट्टी यांची रिअ‍ॅक्शन व्हायरल झाली आहे.

Rohit Sharma : रोहित शर्माचा फ्लॉप शो सुरूच, अनुष्का-अथियाची रिअ‍ॅक्शन सर्वकाही सांगून गेली
Rohit Sharma : रोहित शर्माचा फ्लॉप शो सुरूच, अनुष्का-अथियाची रिअ‍ॅक्शन सर्वकाही सांगून गेली

Athiya Shetty Anushka Sharma At MCG : भारतीय क्रिकेट संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा सध्या वाईट अवस्थेतून जात आहे. त्याची बॅट पूर्णपणे शांत आहे. हिटमॅन एक-एका धावेसाठी धडपडत आहेत. बॉर्डर गावसकर ट्रॉफीमधील चौथ्या कसोटीत टीम इंडियाला विजयासाठी ३४० धावांचे लक्ष्य आहे.

या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्माने चांगली सुरुवात केली. त्याने कोणतेही वाईट शॉट खेळले नाहीत आणि खेळपट्टीवर तो खूपच आरामात खेळताना दिसत होता.

पण या डावात पहिल्यांदाच त्याने क्रॉस शॉट खेळण्याचा प्रयत्न केला आणि फसला. रोहित शर्मा स्कॉट बोलँडच्या चेंडूवर स्लिपमध्ये मिचेल मार्शकडे झेलबाद झाला. रोहित ४० चेंडू खेळून केवळ ९ धावा करून बाद झाला. रोहित बाद होताच स्टँडमध्ये बसलेल्या अनुष्का शर्मा आणि अथिया शेट्टी यांचे पडले. अनुष्का-अथियाची रिअ‍ॅक्शन व्हायरल

मेलबर्न कसोटीच्या पाचव्या दिवशी विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा आणि केएल राहुलची पत्नी अथिया शेट्टी मैदानात हजर आहेत. अशा परिस्थितीत जेव्हा कर्णधार रोहित शर्मा सेट झाल्यानंतर बाद झाला तेव्हा दोघींची निराशा स्पष्टपणे दिसून आली. अथियाने तिचे दोन्ही हात तोंडावर ठेवले. तर अनुष्काही प्रचंड निराश दिसत होती. या दोघींच्या रिअ‍ॅक्शन सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

मेलबर्न कसोटीत काय घडलं?

मेलबर्नच्या MCG येथे खेळल्या जात असलेल्या बॉक्सिंग डे कसोटीत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अशा स्थितीत स्टीव्ह स्मिथच्या शतकी खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४७४ धावा केल्या होत्या.

भारताच्या टॉप ऑर्डरच्या अपयशानंतर खालच्या ऑर्डरमध्ये फलंदाजीला आलेल्या नितीश कुमार रेड्डीने पहिले कसोटी शतक झळकावले, तर वॉशिंग्टन सुंदरने अर्धशतक झळकावले. यामुळे टीम इंडियाने पहिल्या डावात ३६९ धावा केल्या. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलिया २३४ धावांवर ऑलआऊट झाला आणि भारताला ३४० धावांचे लक्ष्य दिले.

Whats_app_banner