Asian Games Team India Schedule: एशियन गेम्स २०२३ ला आजपासून (मंगळवार, १९ सप्टेंबर) सुरुवात होत आहे. या स्पर्धेतील क्रिकेट सामन्यांना येत्या २७ सप्टेंबरपासून सुरुवात होईल. भारतीय संघ थेट क्वार्टर फायनल सामना खेळणार आहे. यापूर्वी ९ सामने खेळले जातील. गटातील सामने जिंकणाऱ्या संघांना गुणांच्या आधारे क्वार्टर फायनलमध्ये स्थान दिले जाईल. भारतीय संघ ३ ऑक्टोबरला त्यांचा पहिला सामना खेळण्यासाठी मैदानात उतरेल. याच दिवशी पाकिस्तानचाही सामना असेल. भारतीय महिला संघाचा पहिला सामना २१ ऑक्टोबर रोजी खेळला जाणार आहे. त्यांचाही हा क्वार्टर फायनल सामना असेल.
या स्पर्धेतील महिला क्रिकेटचा पहिला सामना इंडोनेशिया आणि मंगोलिया यांच्यात खेळला जाणार आहे. तर, भारतीय महिला संघ थेट क्वार्टर फायनल खेळेल. भारतासह पाकिस्तान, बांग्लादेश आणि श्रीलंका क्वार्टर फायनमध्ये पोहोचल्या आहेत. भारतीय महिला संघ त्यांचा पहिला सामना २१ सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे. या सामन्यात विजय मिळवणारा संघ २५ सप्टेंबरला सेमीफायनल सामना खेळेल. यानंतर २५ सप्टेंबरला फायनल सामना खेळला जाईल.
पुरुषांच्या क्रिकेट सामन्यांना २७ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. पुरूष क्रिकेट स्पर्धेतील पहिला सामना नेपाळ आणि मंगोलिया यांच्यात खेळला जाणार आहे. तर, भारतीय पुरूष संघ त्यांचा पहिला सामना ३ ऑक्टोबरला खेळणार आहे. येथेही भारतासह पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंकेने क्वार्टर फायनलमध्ये स्थान मिळवलं आहे. पुरुष क्रिकेट स्पर्धेचा सेमीफायनल सामना ६ ऑक्टोबर आणि फायनल सामना ७ ऑक्टोबरला खेळला जाणार आहे. या स्पर्धेत युवा फलंदाज ऋतुराज गायकवाड भारतीय संघाचे नेतृत्त्व करणार आहे.
ऋतुराज गायकवाड (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, राहुल त्रिपाठी, टिळक वर्मा, रिंकू सिंह, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंह, मुकेश कुमार, शिवम दुबे, प्रभसिमरन सिंह, आकाश दीप.
राखीव: यश ठाकूर, साई किशोर, व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा, साई सुदर्शन.
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, ऋचा घोष, अमनजोत कौर, देविका वैद्य, पूजा वस्त्राकर, तीतास साधू, राजेश्वरी गायकवाड, मिन्नू मणी, कनिका आहुजा, उमा छेत्री, अनुषा बारेड्डी.
राखीव: हरलीन देओल, काश्वी गौतम, स्नेह राणा, सायका इशाक
संबंधित बातम्या