Colombo Weather Forecast, Asia Cup Final IND vs SL 2023 : आशिया चषक 2023 चा अंतिम सामना आज भारत आणि श्रीलंका यांच्यात होणार आहे. विश्वचषकापूर्वी दोन्ही संघांना त्यांची तयारी पूर्ण करण्याची संधी आहे. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी चाहत्यांना भारत-पाकिस्तान फायनलची अपेक्षा होती. ही स्पर्धा जिंकण्यासाठी पाकिस्तानचा संघ फेव्हरिट मानला जात होता. पण तसे घडले नाही.
पाकिस्तानची कामगिरी अत्यंत खराब राहिली आणि सुपर फोरचे दोन सामने गमावल्यानंतर ते सुपर फोरमधूनच बाहेर पडले. त्याचवेळी श्रीलंकेने खूप प्रभावित केले. श्रीलंकेचा संघही गतविजेता आहे. त्यांनी गेल्या वर्षी टी-२० फॉरमॅटमध्ये ही स्पर्धा जिंकली होती. आता त्यांच्यासमोर सात वेळा आशिया चषक विजेत्या भारताचे आव्हान आहे. मात्र, या सामन्यावर पावसाचे सावट आहे.
Accuweather च्या रिपोर्टनुसार, आज रविवारी कोलंबोमध्ये ढगाळ वातावरण असेल. सकाळी काही भागात पाऊस झाला आहे तर दुपारनंतरही पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोलंबोमध्ये आज पावसाची ९० टक्के शक्यता आहे. त्यामुळे सामन्यात पावसाचा अडथळा येऊ शकतो.
दुपारी २ : पावसाची शक्यता - ४९ टक्के
दुपारी ३ : पावसाची शक्यता - ४९ टक्के
दुपारी ४ : पावसाची शक्यता - ४९ टक्के
संध्याकाळी ५ : पावसाची शक्यता - ४९ टक्के
संध्याकाळी ६ : पावसाची शक्यता - ६१ टक्के
संध्याकाळी ७ : पावसाची शक्यता - ४९ टक्के
रात्री ८ : तापमान - पावसाची शक्यता - ५७ टक्के
रात्री ९ : तापमान - पावसाची शक्यता - ४९ टक्के
रात्री १० : तापमान - पावसाची शक्यता - ६५ टक्के
रात्री ११ : तापमान - पावसाची शक्यता - ४९ टक्के