मराठी बातम्या  /  Cricket  /  Asia Cup 2023 Mohammed Siraj Success Story

Mohammed Siraj: डेब्यूत खराब कामगिरी, त्यानंतर थाटात पुनरागमन; सिराजच्या मेहनतीला तोड नाही!

Mohammed Siraj
Mohammed Siraj
Ashwjeet Rajendra Jagtap • HT Marathi
Sep 18, 2023 11:54 AM IST

Mohammed Siraj Success Story: आशिया चषकातील अंतिम सामन्यात मोहम्मद सिराजनं चमकदार कामगिरी केली.

Asia Cup 2023: आशिया चषक २०२३ स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारताचा युवा गोलंदाज मोहम्मद सिराजनं श्रीलंका संघातील फलंदाजांच्या डोळ्यात पाणीच आणलं. या सामन्यात सिराजनं ६ विकेट्स घेतल्या. या कामगिरीसाठी त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी सिराजनं अनेक अडचणींचा सामना केला. पदार्पणाच्या सामन्यात मोहम्मद सिराजने खराब गोलंदाजी केली होती. मात्र, त्यानंतरही माजी कर्णधार विराट कोहलीनं त्याच्यावर विश्वास दाखवला. सिराजनंही मिळालेल्या संधीचं सोनं केलं.

ट्रेंडिंग न्यूज

दरम्यान, भारतीय संघ २०१९ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी गेला होता. या दौऱ्यात सिराजचा संघात समावेश करण्यात आला होता. या मालिकेतील दुसरा सामना अॅडलेडमध्ये खेळला गेला, ज्यात सिराजला पदार्पणाची संधी मिळाली. मात्र, या सामन्यात त्याला काही विशेष कामगिरी करता आली नाही. सिराजने १० षटकात ७६ धावा खर्च केल्या. परंतु, त्याला एकही विकेट मिळवता आली नाही. यानंतर सिराज २०२२ पर्यंत भारताच्या एकदिवसीय संघापासून बाहेर होता.

यानंतर २०२२ मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध एकदिवसीय मालिकेत सिराजला संधी देण्यात आली. यापूर्वी त्यानं २०२० मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. कसोटी क्रिकेटच्या पदार्पणाच्या सामन्यात सिराजनं ५ विकेट्स घेतल्या. यानंतर एकदिवसीय क्रिकेटमध्येही त्यानं थाटात पुनरागमन केलं. २०१९ पर्यंतचा काळ सिराजसाठी खूप आव्हानात्मक होता. देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करत त्यानं निवडकर्त्यांचं लक्ष वेधून घेतलं.

आशिया चषक २०२३ स्पर्धेत सिराजनं पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध करून दाखवलं. सिराजनं आतापर्यंत २९ एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केलं. ज्यात त्यानं ५३ विकेट घेतल्या आहेत. दरम्यान, २१ कसोटी सामन्यात सिराजनं ५९ विकेट्स घेतल्या आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे विराट कोहलीनंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मानंही सिराजवर विश्वास दाखवला. मोहम्मद सिराज हा भारतीय संघाचा आघाडीचा गोलंदाज बनला आहे.

विभाग

Asia cup मधील सर्व ताज्या घडामोडी Cricket News सह Asia Cup schedule आणि प्रत्येक सामन्यागणिक बदलणारा Asia Cup points table पाहा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर