KL Rahul Asia Cup : केएल राहुल पाकिस्तानविरुद्धचा सामना खेळणार नाही, श्रेयसबाबतही आली मोठी अपडेट, पाहा-asia cup 2023 kl rahul will not play against pakistan on september 2 team india squad for asia cup 2023 sanju samson ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  KL Rahul Asia Cup : केएल राहुल पाकिस्तानविरुद्धचा सामना खेळणार नाही, श्रेयसबाबतही आली मोठी अपडेट, पाहा

KL Rahul Asia Cup : केएल राहुल पाकिस्तानविरुद्धचा सामना खेळणार नाही, श्रेयसबाबतही आली मोठी अपडेट, पाहा

Aug 21, 2023 05:08 PM IST

Asia Cup 2023, Team India Squad : यष्टिरक्षक फलंदाज केएल राहुल पूर्णपणे तंदुरुस्त नाही. मात्र, आशिया चषक स्पर्धेसाठी त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे.

Asia Cup 2023
Asia Cup 2023

KL Rahul Will Not Play Against Pakistan : BCCI ने आशिया कपसाठी १८ सदस्यीय टीम इंडियाची घोषणा केली आहे. मुख्य संघात १७ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. त्याचवेळी संजू सॅमसन १८वा खेळाडू (बॅकअप) म्हणून संघात आहे. केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांचीही आशिया कपसाठी टीम इंडियात निवड झाली आहे. मात्र, संघाची घोषणा होताच मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी दोन्ही खेळाडूंच्या फिटनेसबाबत मोठा अपडेट दिला आहे.

केएल राहुल पाकिस्तानविरुद्ध खेळणार नाही

टीम इंडियाची घोषणा करताना भारतीय संघाचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर म्हणाले की केएल राहुल अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त नाही. आशिया चषक स्पर्धेतील सुरुवातीचे एक-दोन सामने तो मिस करू शकतो. त्याचवेळी श्रेयस अय्यर पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे आगरकरांनी सांगितले आहे.

संघाच्या घोषणेच्या वेळी अजित आगरकर म्हणाले की, "श्रेयस अय्यरला पूर्णपणे तंदुरुस्त घोषित करण्यात आले आहे. ही खूप चांगली बातमी आहे. केएल हा राहुलच्या थोडासा अडचणीत आहे. पण आशिया कपच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या सामन्यापर्यंत तो तंदुरुस्त होईल अशी आम्हाला आशा आहे. हे दोघेही आमच्यासाठी खूप महत्त्वाचे खेळाडू आहेत.

आशिया चषक 2023 स्पर्धेसाठी भारताचा १७ सदस्यीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन (राखीव यष्टिरक्षक), रविंद्र पंडय्या, हार्दिक पंडय्या , अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव आणि प्रसिद्ध कृष्णा.

टीम इंडियाचा पहिला सामना २ सप्टेंबरला 

आशिया कप ३० ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात होणार आहे. त्याचबरोबर टीम इंडिया आशिया कपमध्ये २ सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. त्याचबरोबर आशिया चषकाचा अंतिम सामना १७ सप्टेंबरला होणार आहे.