Ravindra Jadeja Record: आशिया कप स्पर्धेत टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने त्याचा नावावर एक नवा विक्रम नोंदवला आहे. त्यानं या एक दिवसीय स्पर्धेत सर्वाधित विकेट घेत पहिला क्रमांक पटकावत नवा विक्रम नोंदवला आहे. या पूर्वी हा विक्रम माजी भारतीय गोलंदाज इरफान पठाणने केला होता. रवींद्र जडेजाने आता इरफान पठाणला मागे टाकलं आहे.
अशीया कपमध्ये मंगळवारी भारताने सुपर ४ सामन्यात श्रीलंकेला हरवले. या सामन्यात रवींद्र जडेजाने श्रीलंकेचा खेळाडू दासून शनाकला बाद करत हा विक्रम नोंदवला आहे. या पूर्वी भारतीय संघासाठी इरफान पठाणने आशिया कपमध्ये १२ सामने खेळले होते. इरफानने २७.५० च्या सरासरीने तब्बल २२ विकेट घेतल्या होत्या. दरम्यान, श्रीलंकेच्या सामण्यापूर्वी जडेजाने देखील २२ विकेट घेतल्या होत्या. मात्र, जडेजाने आशिया कपमध्ये १८ सामन्यात २४ विकेट घेत इरफान पठाणचा विक्रम मोडला आहे.
आशिया कप स्पर्धेत एक दिवसीय सामना प्रकारात जडेजाने हा विक्रम केला आहे. सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत श्रीलंकेचा माजी घातक गोलंदाज मुथय्या मुरलीधरन हा पहिल्या स्थानावर आहे. आशिया कपच्या इतिहासात मुरलीने तब्बल २४ सामने खेळत ३० विकेट्स घेतल्या. तर लसिथ मलिंगाने २९ विकेट्सघेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर अंजता मेंडिस हा २६ विकेट् घेत तिस-या स्थानावर आहे. तर जडेजाने २४ विकेट घेत पाचवा क्रमांक पटकावला आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या सुपर- ४ सामन्यात रवींद्र जडेजा विशेष खेळी करू शकला नाही. या सामन्यात त्याने केवळ ४ धावा काढल्या. रवींद्र जडेजा हा अष्टपैलू खेळाडू आहे. जडेजाने एकदिवसीय क्रिकेट सामन्यात आतापर्यंत २०० विकेट घेतल्या आहेत. त्याच्या नावावर एकाच सामन्यात ५ विकेट घेण्याचा पराक्रमही आहे.
संबंधित बातम्या