मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Mohammed Siraj: अवघ्या १६ चेंडूत श्रीलंकेच्या ५ फलंदाजाला माघारी धाडलं; सिराजच्या नावावर खास विक्रम!

Mohammed Siraj: अवघ्या १६ चेंडूत श्रीलंकेच्या ५ फलंदाजाला माघारी धाडलं; सिराजच्या नावावर खास विक्रम!

Sep 17, 2023 05:55 PM IST

Asia Cup 2023 Final: आशिया चषकातील अंतिम सामन्यात मोहम्मद सिराजनं खतरनाक गोलंदाजी केली.

Mohammed Siraj
Mohammed Siraj

Mohammed Siraj Records: आशिया चषकातील अंतिम सामन्यात भारताचा स्टार युवा गोलंदाज मोहम्मद सिराजनं श्रीलंकेच्या फलंदाजाचं कंबरडं मोडलं. या सामन्यात सिराजनं अवघ्या दोन षटकात श्रीलंकेच्या पाच फलंदाजाला पव्हेलियनचा रस्ता दाखवला. या कामगिरीसह सिराजनं नव्या विक्रमाला गवसणी घातली असून एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद ५ विकेट्स घेणारा तो गोलंदाज ठरला आहे. सिराजनं अवघ्या १६ चेंडूत अशी कामगिरी केली. यापूर्वी हा विक्रम श्रीलंकेचा चामिंडा वासच्या नावावर होता, त्याने २००३ मध्ये बांगलादेशविरुद्ध १६ चेंडूत ५ विकेट्स घेतल्या होत्या.

श्रीलंकाच्या डावातील चौथ्या षटकातील पहिल्या चेंडूवर सिराजनं सलामीवीर पथुम निसांकाला (२, धावा) आऊट केले. यानंतर तिसऱ्या चेंडूवर सदीरा समरविक्रमाला शून्यावर एलबीडब्लू बाद केले. चौथ्या चेंडूवर चरिथ असलंकाला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. याच षटकातील अखेरच्या चेंडूवर धनंजय डिसिल्व्हा आऊट केले. दरम्यान, श्रीलंकेच्या डावातील सहाव्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी आलेल्या सिराजनं श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाला खाते न उघडण्यापूर्वीच आऊट केले.

ट्रेंडिंग न्यूज

या कामगिरीसह मोहम्मद सिराजनं एकदिवसीय क्रिकेटच्या खास क्लबमध्ये एन्ट्री केलीय. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सिराजनं ५० विकेटचा टप्पा पूर्ण केलाय. एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वात जलद ५० विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत सिराजचा समावेश झालाय. अशी कामगिरी करणारा तो भारताचा चौथा गोलंदाज ठरलाय. या यादीत भारताचा माजी वेगवान गोलंदाज आजित आगरकर अव्वल स्थानी आहे. अजित आगरकरने फक्त २३ सामन्यात ५० विकेट घेण्याचा पराक्रम केला होता. यानंतर फिरकी गोलंदाज कुलदीप यादव २४ आणि जसप्रीत बुमराहनं २८ सामन्यात भारतासाठी सर्वात जलद ५० विकेट्स घेतल्या आहेत.

WhatsApp channel
विभाग