india playing 11 for asia cup final : आशिया कपचा अंतिम सामना आज भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो येथे होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता सुरू होईल. मात्र, आशिया कप फायनलसाठी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघात मोठे बदल होणार आहेत.
वास्तविक, विराट कोहली, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज हे बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात प्लेइंग ११ चा भाग नव्हते. मात्र अंतिम सामन्यासाठी या खेळाडूंचे पुनरागमन जवळपास निश्चित मानले जात आहे.
आशिया कप फायनलसाठी प्लेइंग ११ मध्ये ऑल अंडर अक्षर पटेलच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला संधी मिळू शकते. वास्तविक, अक्षर पटेल पूर्णपणे तंदुरुस्त नाही. या कारणास्तव भारतीय संघ व्यवस्थापनाने अक्षर पटेलच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला श्रीलंकेत बोलावले आहे. याशिवाय विराट कोहली, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज यांच्या पुनरागमनानंतर बांगलादेशविरुद्ध खेळलेले सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी आणि प्रसिद्ध कृष्णा यांना बाहेर बसावे लागू शकते.
तसेच, श्रीलंकेच्या संघात एक मोठा बदल होऊ शकतो. त्यांचा फिरकीपटू महीश थिक्षणा आशिया कपमधून बाहेर पडला आहे. तो दुखापतग्रस्त झाला आहे. त्याच्याजागी कोणाला संधी मिळते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
पाथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदिरा समरविक्रमा, चारिथ असालंका, धनंजय डी सिल्वा, दासुन शनाका (कर्णधार), ड्युनिथ वेल्लालगे, सहान अरचिगे, प्रमोद मदुशन आणि मथिशा पाथिराना.