मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  भारत-पाकिस्तान क्रिकेट संबंध सुधारणार? BCCI अध्यक्ष लाहोरला जाणार

भारत-पाकिस्तान क्रिकेट संबंध सुधारणार? BCCI अध्यक्ष लाहोरला जाणार

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Aug 27, 2023 12:29 PM IST

bcci president roger binny visit pakistan asia cup 2023 : भारत आणि पाकिस्तानमधील क्रिकेट संबंध सुधारण्यासाठी एक महत्त्वाचा पुढाकार घेण्यात आला आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी पाकिस्तानला भेट देणार आहेत.

roger binny and rajiv shukla
roger binny and rajiv shukla

roger binny and rajiv shukla pakistan asia cup : आशिया कप 2023 सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. या स्पर्धेतील सर्वात मोठा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना २ सप्टेंबर रोजी होणार आहे. पण त्याआधी पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात उद्घाटनचा सामना रंगणार आहे. हा सामना पाकिस्तानच्या मुल्तान येथे ३० ऑगस्ट रोजी खेळवला जाणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि उपाध्यक्ष राजीव शुक्ला पाकिस्तानला जाणार आहेत. रॉजर बिन्नी आणि राजीव शुक्ला ४ सप्टेंबर रोजी लाहोर येथे होणाऱ्या आशिया चषकाच्या सामन्याला उपस्थितीत लावणार आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटशी संबंधित संबंध संबंध सुधारण्याच्या दृष्टीने या उपक्रमाकडे पाहिले जाऊ शकते. आशिया चषक ३० ऑगस्टपासून होणार असून या स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तानमध्ये होणार आहे.

यावेळी आशिया कपच्या यजमानपदाचा अधिकार पाकिस्तानकडे होता. मात्र भारताने सुरक्षेचे कारण सांगून पाकिस्तानला संघ पाठवण्यास नकार दिला. बऱ्याच वादानंतर ही स्पर्धा पाकिस्तानसह श्रीलंकेत आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. आशिया चषकाचे ४ सामने पाकिस्तानात आणि ९ श्रीलंकेत होणार आहेत. भारतीय संघ आपले सर्व सामने श्रीलंकेतच खेळणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामनाही पाकिस्तानमध्ये होणार आहे.

BCCI अध्यक्षांचा पाकिस्तान दौरा का महत्वाचा?

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील कटु संबंधांचा परिणाम क्रिकेटवरही दिसून आला आहे. २००६ पासून भारताने पाकिस्तान दौरा केला नाही. पाकिस्तानचा संघही २०१२ पासून भारतात आलेला नाही. २०१२ पासून, दोन्ही संघ फक्त आयसीसी स्पर्धा आणि आशिया चषक स्पर्धेत आमने सामने येतात. पण आता बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांचा पाकिस्तान दौरा क्रिकेट संबंध सुधारण्याच्या दृष्टीने मोठे संकेत मानले जात आहेत.

विशेष म्हणजे, २०२५ मध्ये आयसीसी चॅम्पियन्सचे आयोजन पाकिस्तानमध्ये होणार आहे. बीसीसीआयच्या या दौऱ्यानंतर भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जावू शकतो. मात्र, याबाबत अद्याप फारसे काही सांगता येणार नाही. सर्व काही सुरळीत राहिल्यास आगामी काळात दोन्ही देशांमधील द्विपक्षीय मालिकाही पाहायला मिळू शकते.

WhatsApp channel
Cricket News मधील सर्व ताज्या घडामोडी Live Score सह Marathi News आणि प्रत्येक सामन्यागणिक बदलणारा पाहा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर