महिला ॲशेसमध्ये ऑस्ट्रेलियानं इतिहास रचला, इंग्लंडला तिन्ही फॉरमॅटमध्ये एकही सामना जिंकू दिला नाही
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  महिला ॲशेसमध्ये ऑस्ट्रेलियानं इतिहास रचला, इंग्लंडला तिन्ही फॉरमॅटमध्ये एकही सामना जिंकू दिला नाही

महिला ॲशेसमध्ये ऑस्ट्रेलियानं इतिहास रचला, इंग्लंडला तिन्ही फॉरमॅटमध्ये एकही सामना जिंकू दिला नाही

Feb 01, 2025 06:04 PM IST

Womens Ashes 2025 Record AUS vs ENG : महिलांच्या अ‍ॅशेसमध्ये ऑस्ट्रेलियन संघाने इंग्लंडला हरवून मोठा विक्रम केला आहे. ऑस्ट्रेलियाने सर्व फॉरमॅटमध्ये इंग्लंडचा सुपडा साफ केला.

महिला ॲशेसमध्ये ऑस्ट्रेलियानं इतिहास रचला, इंग्लंडला तिन्ही फॉरमॅटमध्ये एकही सामना जिंकू दिला नाही
महिला ॲशेसमध्ये ऑस्ट्रेलियानं इतिहास रचला, इंग्लंडला तिन्ही फॉरमॅटमध्ये एकही सामना जिंकू दिला नाही

महिला ॲशेस २०२५ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात तीन एकदिवसीय सामने, तीन टी-20 आंतरराष्ट्रीय आणि एक कसोटी सामने खेळला गेला. ऑस्ट्रेलियाने या मालिकेत धमाकेदार कामगिरी करत इंग्लंडचा पूर्णपणे सफाया केला. ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने तिन्ही फॉरमॅटमध्ये इंग्लंडला एकही सामना जिंकू दिला नाही.

बहु-फॉरमॅट ऍशेसच्या इतिहासात ऑस्ट्रेलियाने तिन्ही फॉरमॅटच्या मालिकेत इंग्लंडचा व्हाईटवॉश करण्याची ही पहिलीच वेळ आहे. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने ॲशेस २०२५ जिंकून इतिहास रचला.

सर्वात आधी तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली गेली. मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने ४ विकेट्स राखून विजय मिळवला. त्यानंतर दुसऱ्या वनडेत कांगारू संघाने २१ धावांनी विजय मिळवला. यानंतर मालिकेतील शेवटच्या वनडेत ऑस्ट्रेलियाने ८६ धावांनी विजय मिळवला.

यानंतर दोन्ही संघांमध्ये ३ टी-20 सामन्यांची मालिका खेळवण्यात आली. टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ५७ धावांनी विजय मिळवला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात कांगारू संघाने DLS नियमानुसार ६ धावांनी विजय मिळवला. यानंतर अखेरच्या टी-20 मध्ये ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा ७२ धावांनी धुव्वा उडवला.

त्यानंतर अखेरीस दोन्ही संघ एकमेव कसोटी सामन्यासाठी आमनेसामने आले. कसोटीत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा एक डाव आणि १२२ धावांनी पराभव केला. अशा प्रकारे ऑस्ट्रेलियाने ॲशेसमध्ये इंग्लंडचा पूर्णपणे सफाया केला.

ॲनाबेल सदरलँड आणि बेथ मुनी यांची दमदार कामगिरी

कसोटीत ऑस्ट्रेलियाकडून ॲनाबेल सरडालँड आणि बेथ मुनी यांनी अप्रतिम शतकी खेळी खेळली. सदरलँडने २१ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने १६३ धावा केल्या. याशिवाय बेथ मुनीने ७ चौकारांच्या मदतीने १०६ धावा केल्या. या दोघींच्या खेळीच्या बदल्यात ऑस्ट्रेलियाने ४४० धावा फलकावर लावल्या आणि इंग्लंडचा एक डाव आणि १२२ धावांनी पराभव केला.

Whats_app_banner

संबंधित बातम्या