मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  अर्शदीप सिंगच्या नावावर सर्वाधिक वाइड बॉल टाकण्याचा विक्रम, २०२२ पासून किती वाइड बॉल टाकले? पाहा

अर्शदीप सिंगच्या नावावर सर्वाधिक वाइड बॉल टाकण्याचा विक्रम, २०२२ पासून किती वाइड बॉल टाकले? पाहा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 14, 2024 09:29 PM IST

Arshdeep Singh : अर्शदीपने टी-20 क्रिकेटमध्ये २०२२ पासून सर्वाधिक वाइड चेंडू टाकण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. अर्शदीपने अफगाणिस्तानविरुद्ध खेळल्या जाणार्‍या दुसऱ्या टी-20 सामन्यात हा वाइड बॉलचा विक्रम आपल्या नावावर केला.

Arshdeep Singh most wide balls
Arshdeep Singh most wide balls (AFP)

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

यानंतर अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात सर्वबाद १७२ धावा केल्या. भारताला सामना जिंकण्यासाठी १७३ धावा करायच्या आहेत.

तत्पूर्वी, या सामन्यादरम्यान भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंहने एक लाजिरवाणा विक्रम आपल्या नावे केला आहे.

वास्तविक, अर्शदीपने टी-20 क्रिकेटमध्ये २०२२ पासून सर्वाधिक वाइड चेंडू टाकण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. अर्शदीपने अफगाणिस्तानविरुद्ध खेळल्या जाणार्‍या दुसऱ्या टी-20 सामन्यात हा वाइड बॉलचा विक्रम आपल्या नावावर केला.

अर्शदीप आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक वाइड बॉल टाकणारा गोलंदाज बनला आहे. वाइड बॉल टाकण्याच्या बाबतीत त्याने अर्धशतकाचा टप्पा ओलांडला आहे. अर्शदीपने या बाबतीत आयर्लंडच्या मार्क अडायरला मागे टाकले आहे.

आयरिश गोलंदाज मार्क अडायरने ५० वाईड बॉल टाकले आहेत, मात्र अर्शदीपने त्याच्या पुढे जाऊन आतापर्यंत ५१ वाईड बॉल टाकले आहेत.

वेस्ट इंडिजचा जेसन होल्डर या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने ३९ वाईड बॉल टाकले आहेत. यानंतर वेस्ट इंडिजचा रोमॅरियो शेफर्ड ३४ वाईड चेंडूंसह चौथ्या स्थानावर आहे आणि भारताचा रवी बिश्नोई २९ वाईड चेंडूंसह पाचव्या स्थानावर आहे.

२०२२ पासून सर्वाधिक वाईड चेंडू टाकणारे गोलंदाज

अर्शदीप सिंग - ५१

मार्क अडायर- ५०

जेसन होल्डर- ३९

रोमारियो शेफर्ड- ३४

रवी बिश्नोई- २९

अर्शदीपने आज तीन विकेट घेतल्या

अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात अर्शदीपने ३ बळी घेतले आहेत. होळकर क्रिकेट स्टेडियमवर सुरू असलेल्या सामन्यात अर्शदीपने ४ षटकात ३२ धावा देत ३ बळी घेतले. भारतीय वेगवान गोलंदाजाने नजीबुल्ला झद्रान, करीम जनात आणि नूर अहमद यांना आपला बळी बनवले.

WhatsApp channel