भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळवला जात आहे. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याने इतिहास रचला आहे. तो टी 20 आंतरराष्ट्रीयमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने या विक्रमात युझवेंद्र चहल याला मागे टाकले आहे.
भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने पहिल्याच षटकात इंग्लंडचा सलामीचा फलंदाज फिल सॉल्ट तंबूत पाठवले. यानंतर त्याने आपल्या दुसऱ्याच षटकात बेन डकेटची शिकार केली. यासह, तो टी-२० फॉरमॅटमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला.
Sanju Samson Father : माझा मुलगा सुरक्षित नाही, त्याच्या विरोधात कटकारस्थान शिजतंय; संजू सॅमसनच्या वडिलांचे खळबळजनक आरोप
त्याने फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलला मागे टाकले आहे, ज्याने आपल्या T20 कारकिर्दीत ९६ विकेट्स घेतल्या आहेत. पण आता अर्शदीप ९७ विकेट्ससह टी-20 मध्ये भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे.
अर्शदीप सिंगने केवळ ६१ सामन्यांमध्ये ही कामगिरी केली आहे, तर चहलला ९६ विकेट घेण्यासाठी ८० सामन्यांत गोलंदाजी करावी लागली.
भुवनेश्वर कुमार भारतासाठी टी-20I मध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत तिसऱ्या स्थानावर आहे, ज्याने ८७ सामन्यांमध्ये ९० फलंदाजांना आपले बळी बनवले. जसप्रीत बुमराह ८९ विकेट्ससह चौथ्या स्थानावर आहे. जस्सीने ७० सामन्यांमध्ये ही कामगिरी केली आहे. तर हार्दिक पांड्या पाचव्या क्रमांकावर आहे. त्याने ११० टी-20 सामन्यात ८९ विकेट घेतल्या आहेत.
संबंधित बातम्या