अर्जुन तेंडुलकरला विजय हजारे ट्रॉफी खेळण्यासाठी किती पैसे मिळतात? पहिल्याच सामन्यात घेतले ३ विकेट
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  अर्जुन तेंडुलकरला विजय हजारे ट्रॉफी खेळण्यासाठी किती पैसे मिळतात? पहिल्याच सामन्यात घेतले ३ विकेट

अर्जुन तेंडुलकरला विजय हजारे ट्रॉफी खेळण्यासाठी किती पैसे मिळतात? पहिल्याच सामन्यात घेतले ३ विकेट

Dec 22, 2024 02:43 PM IST

Arjun Tendulkar Vijay Hazare Trophy : महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर विजय हजारे ट्रॉफीमध्ये गोव्याकडून खेळत आहे. या स्पर्धेत खेळण्यासाठी त्याला किती पैसे मिळतात, हे आपण येथे जाणून घेणार आहोत.

अर्जुन तेंडुलकरला विजय हजारे ट्रॉफी खेळण्यासाठी किती पैसे मिळतात? पहिल्याच सामन्यात घेतले ३ विकेट
अर्जुन तेंडुलकरला विजय हजारे ट्रॉफी खेळण्यासाठी किती पैसे मिळतात? पहिल्याच सामन्यात घेतले ३ विकेट (AFP)

Arjun Tendulkar Match Fee VJT  : भारताची देशांतर्गत एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा विजय हजारे ट्रॉफी शनिवारपासून (२१ डिसेंबर) सुरू झाली आहे. ही स्पर्धा १८ जानेवारीपर्यंत चालणार आहे. या स्पर्धेत भारताचे अनेक स्टार खेळाडू सहभागी झाले आहेत. यामध्ये श्रेयस अय्यर, रिंकू सिंग, इशान किशन आणि अर्जुन तेंडुलकर या खेळाडूंच्या नावांचा समावेश आहे. 

अर्जुन तेंडुलकर आयपीएलमध्ये चॅम्पियन मुंबई इंडियन्सकडून खेळतो, पण रणजी आणि इतर देशांतर्गत स्पर्धांमध्ये तो गोव्याचे प्रतिनिधित्व करतो.

विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना प्रत्येक सामन्यासाठी ५० हजार रुपये मिळतात. अशा परिस्थितीत अर्जुनलाही प्रत्येक सामना खेळण्यासाठी तेवढेच पैसे मिळतील. विजय हजारे स्पर्धेच्या साखळी टप्प्यात गोवा ७ सामने खेळणार आहे. अशा परिस्थितीत अर्जुनने सातही सामने खेळल्यास त्याला ३.५० लाख रुपये मिळतील.

पहिल्याच सामन्यात अर्जुन तेंडुलकर चमकला

युवा क्रिकेटपटू अर्जुनने विजय हजारे ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात ओडिशाविरुद्ध ३ बळी घेत चमकदार कामगिरी केली. त्याने १० षटकांत ६१ धावा देत ३ बळी घेतले. अर्जुनने ४१व्या षटकात ७ धावांवर अभिषेक राऊतला बाद करून पहिली विकेट घेतली.

त्याने पुढच्याच षटकात कार्तिक बिस्वालीची ५२ चेंडूत ४९ धावांची खेळी संपुष्टात आणली. अर्जुनने पुढे राजेश मोहंतीला ६ धावांवर बोल्ड करून सामन्यातील तिसरी विकेट घेतली. अर्जुनच्या तीन विकेट्समुळे गोव्याने ओडिशाला ३४४ धावांवर ऑलआउट केले आणि सामना २७ धावांनी जिंकला.

गोव्याकडून इशान गाडेकरने ९३ धावा केल्या

अर्जुनला सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीमध्ये बराच संघर्ष करावा लागला होता, त्यानंतर त्याला गोवा संघातूनही वगळण्यातही आले होते.

ओडिशाविरुद्धच्या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर दर्शन मिसाळच्या नेतृत्वाखालील संघाने प्रथम फलंदाजी करताना ३७१ धावांची मोठी धावसंख्या उभारली होती. गोव्याकडून इशान गाडेकरने ९६ चेंडूत ९३ धावा केल्या. सुयश प्रभुदेसाईने गोव्याच्या धावसंख्येला शानदार फिनिशिंग टच दिला आणि अवघ्या २२ चेंडूत ७४ धावा केल्या. 

मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना ओडिशाने चांगली सुरुवात केली आणि त्यांच्या सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी १०७ धावा जोडल्या. मात्र गौरव चौधरीची विकेट गमावल्यानंतर धावांचा वेग कमी झाला. गोव्याची आता पुढील लढत सोमवारी हरियाणाशी होणार आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या