IPL 2025 : आयपीएल मधातच सोडून जाणाऱ्या खेळाडूंना बसणार दणका, BCCI नं आणला हा जबरदस्त नियम, पाहा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IPL 2025 : आयपीएल मधातच सोडून जाणाऱ्या खेळाडूंना बसणार दणका, BCCI नं आणला हा जबरदस्त नियम, पाहा

IPL 2025 : आयपीएल मधातच सोडून जाणाऱ्या खेळाडूंना बसणार दणका, BCCI नं आणला हा जबरदस्त नियम, पाहा

Published Sep 29, 2024 11:16 AM IST

आयपीएल २०२४ मध्ये इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वुड याला लखनौने ७ कोटींना खरेदी केले होते, पण तो नंतर खेळायला आला नाही. अशा स्थितीत संघाचे नुकसान झाले. हा नियम अशाच खेळाडूंसाठी आहे, जे ऑक्शनमध्ये विकले गेल्यानंतर आपले नाव माघार घेतात किंवा आयपीएल मधातच सोडून जातात.

IPL 2025 : आयपीएल मधातच सोडून जाणाऱ्या खेळाडूंना बसणार दणका, BCCI नं आणला हा जबरदस्त नियम, पाहा
IPL 2025 : आयपीएल मधातच सोडून जाणाऱ्या खेळाडूंना बसणार दणका, BCCI नं आणला हा जबरदस्त नियम, पाहा

आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने शनिवारी (२८ सप्टेंबर) खेळाडूंसाठी नवे नियम जाहीर केले आहेत. आयपीएल २०२५ पूर्वी या नियमांची आतुरतेने वाट पाहिली जात होती. आयपीएलच्या अधिकृत वेबसाइटवर पॉइंटरमध्ये एकूण ८ नियम नमूद करण्यात आले आहेत, त्यापैकी एक नियम अतिशय धडाकेबाज दिसत आहे.

हा नियम खूपच खास आहे, तसेच, हा नियम आपला स्वार्थ साधणाऱ्या परदेशी खेळाडूंना अद्दल घडवणाराही असेल. चला तर मग जाणून घेऊया काय आहे आयपीएलचा हा नवा नियम.

वास्तविक, आयपीएल २०२४ मध्ये इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वुड याला लखनौने ७ कोटींना खरेदी केले होते, पण तो नंतर खेळायला आला नाही. अशा स्थितीत संघाचे नुकसान झाले. हा नियम अशाच खेळाडूंसाठी आहे, जे ऑक्शनमध्ये विकले गेल्यानंतर आपले नाव माघार घेतात किंवा आयपीएल मधातच सोडून जातात.

पण आता परदेशी खेळाडूंना आयपीएल मधात सोडून जाता येणार नाही. जर त्यांनी असे केले त्यांच्यावर दोन वर्षांची बंदी घालण्यात येईल.

आयपीएलने एकूण ८ नियमांबद्दल माहिती दिली आहे, ज्यामध्ये सहावा नियम विक्री झाल्यानंतर स्पर्धेत सहभागी न होणाऱ्या खेळाडूंवर बंदी घालण्याचा आहे.

नियमानुसार, "विदेशी खेळाडूंना मेगा लिलावासाठी नोंदणी करावी लागणार आहे. यानंतर फक्त नोंदणीकृत खेळाडूच पुढील दोन वर्षांसाठी (२०२७) भाग घेऊ शकतात. लिलावात निवडलेल्या खेळाडूंनी हंगाम सुरू झाल्यानंतर स्पर्धा सोडल्यास त्यांच्यावर दोन वर्षांची बंदी घालण्यात येईल.

परदेशी खेळाडूंनी मोठ्या लिलावात नोंदणी करणे आवश्यक 

मेगा लिलावासाठी परदेशी खेळाडूंना नोंदणी करावी लागेल, हा नियम आयपीएलनेही मंजूर केला आहे. मोठ्या लिलावासाठी परदेशी खेळाडूंनी स्वत:ची नोंदणी न केल्यास ते पुढील वर्षी होणाऱ्या खेळाडूंच्या लिलावासाठी नोंदणी करण्यास पात्र राहणार नाहीत.

संघ ६ खेळाडूंना रिटेन करू शकणार

२०२२ च्या आयपीएलपूर्वी झालेल्या मेगा लिलावात संघांना फक्त ४ खेळाडूंना कायम ठेवण्याचा पर्याय होता. आता २०२५ च्या मेगा लिलावापूर्वी, संघ एकूण ६ खेळाडूंना कायम ठेवण्यास सक्षम असतील.

Whats_app_banner

संबंधित बातम्या