Rohit sharma anushka sharma hug : रोहित शर्मा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारा तिसरा भारतीय कर्णधार ठरला आहे. रविवारी (९ मार्च) टीम इंडियाने फायनलमध्ये न्यूझीलंडचा ४ गडी राखून पराभव करत विजेतेपद पटकावले. सामना संपल्यानंतर सर्व खेळाडूंचे कुटुंबीय मैदानावर आले आणि त्यांनी ट्रॉफीसोबत फोटो काढले. सर्व खेळाडूंचे कुटुंबीय एकमेकांना भेटत होते.
विराट कोहली सर्वप्रथम पत्नी अनुष्का शर्माकडे गेला आणि तिला मिठी मारली. यानंतर त्याने अनुष्काला मैदानात आणले. यानंतर अनुष्का शर्माने कर्णधार रोहित शर्माला मिठी मारून विजयासाठी शुभेच्छा दिल्या.
रोहित शर्माने अंतिम सामन्यात ७६ धावांची मॅचविनिंग इनिंग खेळली. त्याने शुभमन गिलसोबत १०५ धावांची भागीदारी केली. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात अंतिम सामन्यात खेळलेल्या पहिल्या विकेटसाठी ही तिसरी शतकी भागीदारी आहे. या खेळीसाठी रोहित शर्माला सामनावीर म्हणून निवडण्यात आले.
अंतिम सामना संपल्यानंतर सर्व खेळाडू आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मैदानावर येऊन ट्रॉफीसोबत फोटो काढले. विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माने कर्णधार रोहितला मिठी मारून विजयाचे अभिनंदन केले.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलनंतर अनुष्का शर्मा रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेहसोबत उभी होती. रोहितने आधी पत्नीला, नंतर मुलीला मिठी मारली. यानंतर त्याने अनुष्का शर्माला मिठी मारली. सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ एकमेकांना विजयाच्या शुभेच्छा देत होते.
दरम्यान, टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीतील आपले सर्व सामने दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर खेळले. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या सर्व सामन्यांमध्ये विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा आणि रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह टीम इंडियाला चीअर करण्यासाठी आल्या होत्या.
संबंधित बातम्या