Anmolpreet Singh Fastest Century Record : भारतीय देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा विजय हजारे ट्रॉफी २०२४-२०२५ या स्पर्धेला सुरुवात झाली आहे. अनेक युवा भारतीय खेळाडू या स्पर्धेचा भाग आहेत. अशा परिस्थितीत पंजाबकडून खेळणाऱ्या २६ वर्षीय अनमोलप्रीत सिंग याने इतिहास रचला आहे. त्याने अरुणाचल प्रदेशविरुद्ध अवघ्या ३५ चेंडूत शतक झळकावून लिस्ट ए च्या इतिहासातील तिसरे जलद शतक ठोकले.
अनमोलप्रीतने नाबाद ११५ धावा केल्या. त्याने १२ चौकार आणि ९ षटकार मारले. चौकार षटकार मिळून अनमोलप्रीतने २१ चेंडूत १०२ धावांचा पाऊस पाडला.
वास्तविक, अरुणाचल संघाने प्रथम फलंदाजी करताना ४८.४ षटकात १६४ धावा केल्या. यादरम्यान देवांश गुप्ताने २२ धावांची खेळी केली. टेची नेरीने ४२ धावा केल्या. ७३ चेंडूंचा सामना करताना त्याने २ चौकार आणि २ षटकार मारले. प्रत्युत्तरात पंजाबने १२.५ षटकांत १ गडी गमावून सामना जिंकला.
पंजाबकडून कर्णधार अभिषेक शर्मा आणि प्रभसिमरन सिंग सलामीला आले. अभिषेक १० धावा करून बाद झाला. तर प्रभासिमरनने ३५ धावा केल्या. तर अनमोलप्रीतने शतक झळकावले.
अनमोलप्रीत लिस्ट ए मध्ये सर्वात जलद शतक झळकावणारा भारतीय ठरला आहे. त्याने ३५ चेंडूत शतक झळकावले. अनमोलप्रीतने ४५ चेंडूत नाबाद ११५ धावा केल्या. त्याने १२ चौकार आणि ९ षटकार मारले. या सामन्यात एबी डिव्हिलियर्सचा विक्रम मोडण्यापासून वाचला. डिव्हिलियर्सने ३१ चेंडूत शतक झळकावले होते.
जॅक फ्रेझर-मॅकगर्कने लिस्ट ए मध्ये सर्वात जलद शतक झळकावले आहे. दक्षिण ऑस्ट्रेलिया आणि तस्मानिया यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याने २९ चेंडूत शतक झळकावले होते.
तर दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यात झालेल्या सामन्यात डिव्हिलियर्सने ३१ चेंडूत शतक झळकावले होती. यानंतर अनमोलप्रीतचा नंबर आहे. शाहिद आफ्रिदीने ३७ चेंडूत शतक झळकावले आहे. श्रीलंकेविरुद्ध त्याने तुफानी खेळी खेळली होती.
अनमोलप्रीतने लिस्ट ए मध्ये ४९ सामने खेळले आहेत. या कालावधीत त्याने १४९२ धावा केल्या आहेत. अनमोलप्रीतने या फॉरमॅटमध्ये ४ शतके आणि ८ अर्धशतके केली आहेत. त्याने ४६ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये २८८० धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याने ७ शतके आणि १२ अर्धशतके केली आहेत.
संबंधित बातम्या