मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  WI vs SA Turning Point : आंद्रे रसेलच्या चुकीमुळे विंडीज टी-20 विश्वचषकातून बाहेर, व्हिडीओ पाहा

WI vs SA Turning Point : आंद्रे रसेलच्या चुकीमुळे विंडीज टी-20 विश्वचषकातून बाहेर, व्हिडीओ पाहा

Jun 24, 2024 02:17 PM IST

Wi Vs Sa Super 8 Highlights : गट २ मधील दोन संघ उपांत्य फेरीसाठी निश्चित झाले आहेत. इंग्लंडनंतर दक्षिण आफ्रिकेनेही सह यजमान वेस्ट इंडिजचा पराभव करून उपांत्य फेरीतील आपले स्थान पक्के केले आहे.

WI vs SA Turning Point : आंद्रे रसेलच्या चुकीमुळे विंडीज टी-20 विश्वचषकातून बाहेर, व्हिडीओ पाहा
WI vs SA Turning Point : आंद्रे रसेलच्या चुकीमुळे विंडीज टी-20 विश्वचषकातून बाहेर, व्हिडीओ पाहा

टी-20 विश्वचषक २०२४ मध्ये, आज म्हणजेच २४ जून रोजी सह-यजमान वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुपर ८ सामना खेळला गेला. दोन्ही संघांसाठी हा करा किंवा मरो असा सामना होता. हा सामना दक्षिण आफ्रिकेने शेवटच्या षटकात जिंकला.

या विजयानंतर आफ्रिकेने सेमी फायनल गाठली आहे. तर वेस्ट इंडिज टी-२० विश्वचषकातून बाहेर पडला आहे. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने ८ गडी गमावून १३५ धावा केल्या होत्या.

दुसऱ्या डावात सामना सुरू झाल्यानंतर पाऊस आला, त्यावेळी दक्षिण आफ्रिकेला १७ षटकांत विजयासाठी १२३ धावांची गरज होती. डीएलएस पद्धतीमुळे आफ्रिकेने शेवटच्या षटकात ३ विकेट्स राखून हा रोमांचक सामना जिंकला.

ट्रेंडिंग न्यूज

आंद्रे रसेलच्या रनआउटमुळे सामना फिरला

वास्तविक, अनुभवी वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा दक्षिण आफ्रिकेकडून वेस्ट इंडिजच्या डावातील १८वे षटक टाकण्यासाठी आला होता. रबाडाच्या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर अकील हुसेन स्ट्राइकवर होता. हुसेनने शॉर्ट थर्डच्या दिशेने शॉट खेळला. पण एनरिच नॉर्खिया ​​तिथे फिल्डींगसाठी उपस्थित होता.

नॉन स्ट्राइक एंडला असलेला तुफानी हिटर आंद्रे रसेलने धाव घेण्यासाठी धावला, पण नॉर्खियाच्या डायरेक्ट हिटवर धावबाद झाला. रसेल चांगल्या टचमध्ये दिसत होता. धावबाद होण्यापूर्वी त्याने २ षटकारही मारले होते.

आंद्रे रसेल ९ चेंडूत १५ धावा करून बाद झाला. रसेल धावबाद झाला नसता तर वेस्ट इंडिजला १५० किंवा त्याहून अधिक धावा करता आल्या असत्या. त्याच्या बाद झाल्यामुळे संपूर्ण सामना लो स्कोअरिंग झाला. रसेल बाद झाल्यानंतर वेस्ट इंडिजला आणखी फक्त १८ धावांची भर घालता आली.

रसेलला हवे असते तर तो एकेरी घेण्यास नकार देऊ शकला असता आणि अनुभवी फलंदाज असल्याने तो स्ट्राइक स्वतःकडे ठेवू शकला असता. पण त्याने तसे केले नाही.

रोस्टन चेसचा जादूई स्पेल व्यर्थ

वेस्ट इंडिजने १२३ धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला चांगलाच घाम गाळावा लागला. आफ्रिकेने कसा तरी हा सामना जिंकला. एकेकाळी हा सामना वेस्ट इंडिज जिंकेल असे वाटत होते. रोस्टन चेसने आपल्या जादुई स्पेलने संपूर्ण सामना फिरवला होता. त्याने ३ षटकात केवळ १२ धावा दिल्या आणि ३ बळी घेतले. चेसने फलंदाजीतही वेस्ट इंडिजकडून सर्वाधिक ५२ धावा केल्या होत्या. चेसने डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स आणि केशव महाराज यांना बाद केले होते. मात्र, त्याची मेहनत व्यर्थ गेली आणि अखेरच्या षटकात वेस्ट इंडिजचा पराभव झाला.

WhatsApp channel