Viral Video : हारिस रौफच्या गोलंदाजीवर आंद्रे रसेलचा गगनचुंबी षटकार, प्रेक्षक, खेळाडू सर्वजण पाहातच राहिले
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Viral Video : हारिस रौफच्या गोलंदाजीवर आंद्रे रसेलचा गगनचुंबी षटकार, प्रेक्षक, खेळाडू सर्वजण पाहातच राहिले

Viral Video : हारिस रौफच्या गोलंदाजीवर आंद्रे रसेलचा गगनचुंबी षटकार, प्रेक्षक, खेळाडू सर्वजण पाहातच राहिले

Updated Jul 09, 2024 02:38 PM IST

आंद्रे रसेलने मारलेला हा षटकार १०७ मीटर लांब गेला. यानंतर लॉस एंजेलिस नाइट रायडर्सचा खेळाडू आंद्रे रसेलचा हा गगनचुंबी सिक्स मेजर लीग क्रिकेटमध्ये चर्चेत आला आहे.

हारिस रौफच्या गोलंदाजीवर आंद्रे रसेलचा गगनचुंबी षटकार, प्रेक्षक, खेळाडू सर्वजण पाहतच राहिले
हारिस रौफच्या गोलंदाजीवर आंद्रे रसेलचा गगनचुंबी षटकार, प्रेक्षक, खेळाडू सर्वजण पाहतच राहिले

टी-20 वर्ल्डकप २०२४ नंतर अमेरिकेत सध्या मेजर लीग क्रिकेट खेळली जात आहे. MLC २०२४ चा चौथा सामना सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स (San Francisco Unicorns) आणि लॉस एंजेलिस नाइट रायडर्स (LAKR) यांच्यात खेळला गेला. या सामन्यात आंद्रे रसेलने पाकिस्तानी वेगवान गोलंदाज हारिस रौफच्या गोलंदाजीवर दमदार षटकार ठोकला. या षटकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आंद्रे रसेलने मारलेला हा षटकार १०७ मीटर लांब गेला. यानंतर लॉस एंजेलिस नाइट रायडर्सचा खेळाडू आंद्रे रसेलचा हा गगनचुंबी सिक्स मेजर लीग क्रिकेटमध्ये चर्चेत आला आहे. वास्तविक, या सामन्याच्या पहिल्या डावातील शेवटच्या षटकात रसेलने हा षटकार मारला.

सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्सचा गोलंदाज रौफने लेन्थ बॉल टाकला. शानदार फलंदाजी करताना, रसेलने चेंडू इतका जोरात मारला की तो थेट मिडविकेटवर गेला आणि स्टेडियमच्या बाहेर १०७ मीटरवर जाऊन पडला. हा षटकार पाहून मैदानात उपस्थित प्रेक्षकही थक्क झाले. रसेलने गेल्या वर्षी म्हणजे २०२३ मध्ये रौफलाे असाच षटकार मारला होता.

आंद्रे रसेलच्या संघाचा पराभव

आंद्रे रसेलने या सामन्यात १६० च्या स्ट्राईक रेटने २५ चेंडूत ४० धावा केल्या. या बळावर लॉस एंजेलिस नाइट रायडर्सने २० षटकांत ६ गडी गमावून १६५ धावा केल्या.

प्रत्युत्तरात सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स संघाने केवळ १५.२ षटकांत १६६ धावांचे लक्ष्य गाठले. फिन ऍलनने शानदार फलंदाजी करत ३७ चेंडूत ६३ धावा केल्या तर मॅथ्यू शॉर्टने २६ चेंडूत ५८ धावा केल्या. या दोन खेळाडूंमुळे युनिकॉर्नने नाइट रायडर्सचा सहज पराभव केला.

Whats_app_banner

संबंधित बातम्या