T20 World Cup 2024 : ‘या’ नवख्या संघांना हलक्यात घेऊ नका, एखाद्या मोठ्या संघाला दणका देऊ शकतात, जाणून घ्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  T20 World Cup 2024 : ‘या’ नवख्या संघांना हलक्यात घेऊ नका, एखाद्या मोठ्या संघाला दणका देऊ शकतात, जाणून घ्या

T20 World Cup 2024 : ‘या’ नवख्या संघांना हलक्यात घेऊ नका, एखाद्या मोठ्या संघाला दणका देऊ शकतात, जाणून घ्या

Published Jun 05, 2024 10:31 PM IST

T20 World Cup 2024 : टी-20 वर्ल्डकप २०२४ मध्ये अमेरिका आणि स्कॉटलंडने आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. हे संघ एखाद्या मोठ्या संघाला दणका देऊ शकतात.

T20 World Cup 2024 : ‘या’ नवख्या संघांना हलक्यात घेऊ नका, एखाद्या मोठ्या संघाला दणका देऊ शकतात, जाणून घ्या
T20 World Cup 2024 : ‘या’ नवख्या संघांना हलक्यात घेऊ नका, एखाद्या मोठ्या संघाला दणका देऊ शकतात, जाणून घ्या

America Cricket and Scotland Cricket team : टी-20 विश्वचषक २०२४ मध्ये आतापर्यंत ७ सामने खेळले गेले आहेत. यातील काही सामने मोठ्या संघांमध्ये खेळले गेले आहेत. पण छोट्या (असोसिएट नेशन) संघांनी आपल्या दमदार कामगिरीने सर्व मोठ्या संघांना चकित केले आहे. यामध्ये अमेरिका आणि स्कॉटलंड आणि नामिबियाच्या संघांचा समावेश आहे.

अमेरिका आणि स्कॉटलंडची दमदार कामगिरी

टी-20 विश्वचषक २०२४ चा यजमान संघ अमेरिकाचा पहिला सामना कॅनडाशी झाला. या सामन्यात चौकार आणि षटकारांची संख्या जास्त होती. अमेरिकेने कॅनडाच्या १९५ धावांच्या मोठ्या धावसंख्येचा सहज पाठलाग केला. अमेरिकेने अवघ्या १७.४ षटकांत १९७ धावा करत हे लक्ष्य गाठले.

या सामन्यात आरोन जोन्सने स्फोटक फलंदाजी केली. जोन्सने २३५ च्या स्ट्राईक रेटने ४० चेंडूत ९४ धावांची नाबाद खेळी खेळली. यामध्ये ४ चौकार आणि १० षटकारांचा समावेश होता. याशिवाय अँड्रिस गसनेही शानदार फलंदाजी केली. गसने ४६ चेंडूत १४१.३० च्या स्ट्राइक रेटने ६५ धावा केल्या, ज्यात ७ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता.

त्याच वेळी, T20 विश्वचषक २०२ च्या ७ व्या सामन्यात स्कॉटलंडचा सामना गतविजेत्या इंग्लंडशी झाला. या सामन्यात स्कॉटलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुसळधार पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आला. पण त्याआधी स्कॉटलंडने १० षटके फलंदाजी केली. स्कॉटलंडने १० षटकांत इंग्लंडच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. स्कॉटलंडने एकही विकेट न गमावता १० षटकांत ९० धावा केल्या होत्या.

स्कॉटलंडचा फलंदाज जॉर्ज मुनसेने १३२ च्या स्ट्राईक रेटने ३१ चेंडूत नाबाद ४१ धावा केल्या, ज्यात ४ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. त्याच्यासोबत फलंदाजीला आलेल्या मायकेल जोन्सने १५० च्या स्ट्राईक रेटने ३० चेंडूत नाबाद ४५ धावा केल्या. हा सामना पावसामुळे रद्द करावा लागला. सामना पूर्णपणे खेळला गेला असता तर स्कॉटलंडचा संघ इंग्लंडवर वर्चस्व गाजवू शकला असता. स्कॉटलंडला या सामन्यात कडवी झुंज देऊन इंग्लंडला पराभूत करता आले असते.

अशा स्थितीत अमेरिका, स्कॉटलंड आणि नामिबियाचे संघ मोठ्या संघाला धुळ चारू शकतात. त्यामुळे या संघांना हलक्यात घेण्याची चुक मोठे संघ करणार नाहीत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या