मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  धोनीच्या जागी रोहित शर्मा होऊ शकतो सीएसकेचा कर्णधार; अंबाती रायुडूच्या वक्तव्याने खळबळ

धोनीच्या जागी रोहित शर्मा होऊ शकतो सीएसकेचा कर्णधार; अंबाती रायुडूच्या वक्तव्याने खळबळ

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Mar 11, 2024 04:37 PM IST

Rohit Sharma CSK Captain : मुंबई इंडियन्सने आगामी स्पर्धेसाठी रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याकडे कर्णधारपद सोपवले आहे. गुजरात टायटन्स आणि मुंबईचे इंडियन्सचे वातावरण वेगळे असल्याने हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद सांभाळणे कठीण जाईल, असे रायुडूचे मत आहे

Rohit Sharma CSK Captain धोनीच्या जागी रोहित शर्मा सीएसकेचा कर्णधार होऊ शकतो, अंबाती रायडूच्या वक्तव्याने खळबळ
Rohit Sharma CSK Captain धोनीच्या जागी रोहित शर्मा सीएसकेचा कर्णधार होऊ शकतो, अंबाती रायडूच्या वक्तव्याने खळबळ

Rohit Sharma, Chennai Super Kings : आगामी आयपीएलसाठी सर्व फ्रँचायझींनी तयारी सुरू केली आहे. आयपीएल २०२४ चा थरार २२ मार्चपासून रंगणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्याने आयपीएल २०२४ ची सुरुवात होणार आहे.

चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सलामीचा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाईल. पण या सामन्याआधी सीएसकेचा माजी दिग्गज खेळाडू अंबाती रायडूने एक मोठं वक्तव्ये केले आहे. रायडूचे वक्तव्य रोहतित शर्माच्या चाहत्यांना खूश करणारे आहे. 

मुंबई इंडियन्सने आगामी स्पर्धेसाठी रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याकडे कर्णधारपद सोपवले आहे. गुजरात टायटन्स आणि मुंबईचे इंडियन्सचे वातावरण वेगळे असल्याने हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद सांभाळणे कठीण जाईल, असे रायुडूचे मत आहे. 

तसेच, हार्दिक पंड्याने मुंबईसाठी एक वर्ष खेळून नंतर कर्णधारपद स्वीकारायला हवे होते, असेही रायुडूने म्हटले आहे. कारण रोहित शर्मा अजूनही भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे.

अंबाती रायडू नेमकं काय म्हणाला?

रोहित शर्माची इच्छा असेल तर तो पुढील ५ ते ६ वर्षे आयपीएल खेळू शकतो. त्याला कर्णधार व्हायचे असेल तर संपूर्ण जग त्याच्यासाठी खुले आहे. त्याला पाहिजे तिथे तेव्हा तो कोणत्याही संघाचे कर्णधारपद सांभाळू शकतो. तसेच, २०२५ मध्ये रोहित शर्माने चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार व्हावे अशी माझी इच्छा आहे. एमएस धोनी निवृत्त झाल्यास, रोहित शर्मा सीएसकेचा कर्णधार बनू शकतो", असे रायूडने म्हटले आहे.

मुंबई इंडियन्सचा पहिला सामना २४ मार्च रोजी

आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत रोहित शर्मा चौथ्या स्थानावर आहे. रोहितने आतापर्यंत २४३ सामन्यात ६२११ धावा केल्या आहेत. मुंबई इंडियन्स २४ मार्च रोजी गुजरात टायटन्स आयपीएल २०२४ पहिला सामना खेळेल.

WhatsApp channel