मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Ambati Rayudu : अंबाती रायडूने ९ दिवसांत राजकारण सोडलं, वायएसआर कॉंग्रेसला दिली सोडचिठ्ठी

Ambati Rayudu : अंबाती रायडूने ९ दिवसांत राजकारण सोडलं, वायएसआर कॉंग्रेसला दिली सोडचिठ्ठी

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 06, 2024 01:46 PM IST

Ambati Rayudu Leave YSR Congress : भारताचा माजी क्रिकेटपटू अंबाती रायडूने काही काळासाठी राजकारणातून ब्रेक घेतला आहे. रायुडू याने वायएसआर कॉंग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. तो ९ दिवसांपूर्वी या पक्षात सामील झाले होता.

Ambati Rayudu
Ambati Rayudu (PTI)

Ambati Rayudu Politics : टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू अंबाती रायुडूने वायएसआर काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने ही माहिती दिली. विशेष म्हणजे, अंबाती रायडूने केवळ ९ दिवसांपूर्वी म्हणजेच २८ डिसेंबर रोजी YSR कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

पण आता काही दिवसातच शनिवारी (६ जानेवारी) त्याने पक्ष सोडण्याचा आणि काही काळ राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय जाहीर केला आहे. रायूडने हा असा अचानक निर्णय का घेतला, याचे कारण स्पष्ट केलेले नाही, वेळ आल्यावर आपली पुढील वाटचाल सांगू, असे त्याने स्पष्टे केले.

'मी वायएसआरसीपी पक्ष सोडून काही काळ राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील निर्णय योग्य वेळी कळविली जाईल,' असे रायूडने सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे.

अंबाती रायडू टीम इंडियातून निवृत्ती घेतल्यानंतर आयपीएलमध्ये चेन्नई सपर किंग्सकडून खेळायचा. गेल्यावर्षी म्हणजेच आयपीएल २०२३ नंतर त्याने IPL लाही रामराम ठोकला.

रायडूने २८ डिसेंबर रोजी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि वायएसआर काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष जगनमोहन रेड्डी यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला होता. पण आता त्याने राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे.

अंबाती रायडूने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ५५ एकदिवसीय आणि ६ टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. याशिवाय त्याने आपल्या आयपीएल करिअरमध्ये २०३ सामने खेळले.

WhatsApp channel
For latest Cricket News Live Score stay connected with HT Marathi