Allah Ghazanfar : १८ वर्षांचा अल्लाह गझनफर मुंबई इंडियन्समध्ये, राशीद खानसारखीच गोलंदाजी आणि हटके फलंदाजी करतो
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Allah Ghazanfar : १८ वर्षांचा अल्लाह गझनफर मुंबई इंडियन्समध्ये, राशीद खानसारखीच गोलंदाजी आणि हटके फलंदाजी करतो

Allah Ghazanfar : १८ वर्षांचा अल्लाह गझनफर मुंबई इंडियन्समध्ये, राशीद खानसारखीच गोलंदाजी आणि हटके फलंदाजी करतो

Nov 25, 2024 05:30 PM IST

Allah Ghazanfar IPL 2025 Mega Auction : मुंबई इंडियन्सने अफगाणिस्तानचा युवा मिस्ट्री स्पिनर अल्लाह गझनफर याच्यावर मोठी बोली लावली आहे. मुंबईने अल्लाह गझनफरला ४.८० कोटींना विकत घेतले आहे.

Allah Ghazanfar : १८ वर्षांचा अल्लाह गझनफर मुंबई इंडियन्समध्ये, राशीद खानसारखीच गोलंदाजी आणि हटके फलंदाजी करतो
Allah Ghazanfar : १८ वर्षांचा अल्लाह गझनफर मुंबई इंडियन्समध्ये, राशीद खानसारखीच गोलंदाजी आणि हटके फलंदाजी करतो

Allah Ghazanfar In Mumbai Indians IPL Auction : आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात मुंबई इंडियन्सने मोठा डाव खेळला आहे. मुंबईने अफगाणिस्तानच्या अल्लाह गझनफर याला विकत घेतले आहे. तो फक्त १८ वर्षांचा आहे. गझनफरला मुंबईने ४.८० कोटी रुपयांना खरेदी केले. त्याची मूळ किंमत ७५ लाख रुपये होती. गझनफरचा देशांतर्गत रेकॉर्ड चांगला आहे. यापूर्वी तो मुंबई इंडियन्सचा नेट बॉलरही होता.

गझनफरवर पहिली बोली कोलकाता नाईट रायडर्सने लावली होती. यानंतर आरसीबीही या शर्यतीत सामील झाला. पण आरसीबीने शेवटची बोली २ कोटी रुपयांपर्यंत लावली. KKR बद्दल बोलायचे तर ४.६० कोटींची शेवटची बोली लावली. पण शेवटी मुंबईचा विजय झाला. मुंबईने त्याला ४.८० कोटी रुपयांना खरेदी केले.

गझनफर हा मुंबईचा नेट बॉलर 

अल्लाह गझनफरचा आतापर्यंतचा रेकॉर्ड चांगला आहे. तो मुंबई इंडियन्सचा नेट बॉलर राहिला आहे. पण व्हिसा नसल्याने तो भारतात येऊ शकला नाही. पण तो आता मुंबईच्या मुख्य संघाचा भाग असेल.

तो आतापर्यंत अफगाणिस्तानसाठी ८ एकदिवसीय सामने खेळला आहे. या कालावधीत १२ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने लिस्ट ए च्या १२ सामन्यात १६ विकेट घेतल्या आहेत. त्याचबरोबर १६ टी-20 सामन्यात २९ विकेट्स घेतल्या आहेत.

मुंबईने या खेळाडूंवर खर्च केला पैसा -

मुंबई इंडियन्सनेही दीपक चहरवर पैसे खर्च केले. मुंबईने त्याला ९.२५ कोटी रुपयांना खरेदी केले. चहरची मूळ किंमत २ कोटी रुपये होती. संघाने रायन रिक्लेटनला एक कोटी रुपयांना खरेदी केले.

यानंतर मुंबईने कर्ण शर्माला ५० लाखात आणि रॉबिन मिंजला ६५ लाखांना खरेदी केले. टीमने नमन धीरसाठी आरटीएमचा वापर केला. त्यांना ५.२५ कोटी रुपये पगार मिळणार आहे.

मुंबईने या खेळाडूंना रिटेन केले -

मुंबईने सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह आणि तिलक वर्मा यांना रिटेन केले होते. राखून ठेवलेल्या खेळाडूंच्या यादीत बुमराहचे मानधन सर्वाधिक आहे. त्याला १८ कोटी रुपये मिळतील. सूर्या आणि हार्दिक यांना समान वेतन मिळेल. त्यांचा पगार १६.३५ कोटी रुपये आहे.

Whats_app_banner