PAK vs ENG 2nd test scorecard : पाकिस्तानने मुल्तान कसोटीत इंग्लंडचा दणदणीत पराभव केला आहे. विशेष म्हणजे, बाबर आझम आणि शाहीन शाह आफ्रिदी यांना संघातून वगळल्यानंतर पाकिस्ताननला हा विजय मिळाला आहे. पाकिस्तानने मालिकेतील दुसऱ्या सामन्यात मुलतान क्रिकेट मैदानावर इंग्लंडचा १५२ धावांनी पराभव केला. पहिला सामना इंग्लंडने जिंकला होता.
पाकिस्तान पहिला डाव - ३६६ धावांवर सर्वबाद
इंग्लंड पहिला डाव- २९१ धावांवर सर्वबाद
पाकिस्तान दुसरा डाव- २९१ धावांवर सर्वबाद
इंग्लंड दुसरा डाव- १४४ धावांवर सर्वबाद
विशेष म्हणजे पाकिस्तानने सलग ११ पराभवानंतर घरच्या मैदानावर पहिला कसोटी विजय मिळवला. तसेच, कर्णधार म्हणून शान मसूद याचा हा पहिलाच विजय आहे. याच मैदानावर इंग्लंडने पाकिस्तानचा पराभव केला होता. तर आता पाकिस्तानने प्रत्युत्तर दिले आहे. कसोटी मालिका आता १-१ अशी बरोबरीत आहे. या सामन्यात पाकिस्तानच्या विजयाचे हिरो नोमान अली आणि साजिद खान हे ठरले. या दोघांनी मिळून इंग्लंडच्याे सर्व २० विकेट घेतल्या.
इंग्लंडला आज (१८ ऑक्टोबर) २६१ धावा करायच्या होत्या आणि त्यांचे ८ फलंदाज बाकी होते. पण इंग्लंडला या धावा करता आल्या नाहीत. डावखुरा फिरकी गोलंदाज नोमान अलीने ४६ धावांत ८ बळी घेतले आणि सामन्यात ११ बळी घेतले. तर आणि इंग्लंडचा संघ चौथ्या दिवशी पहिल्या सत्रातच १४४ धावांवर बाद झाला.
ऑफस्पिनर साजीद खानने पहिल्या डावात ९३ धावांत २ बळी घेतले. त्याने पहिल्या डावात १११ धावांत ७ बळी घेतले होते.
या सामन्यात पाकिस्तानने इंग्लंडसमोर विजयासाठी २९७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. पण चौथ्या डावात फिरकीपटूंना मदत करणाऱ्या पीचवर या धावा बनवणे खूप कठीण होते. इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या १४४ धावांवर गारद झाला.
कर्णधार शान मसूदचा हा विजय पहिला विजय होता. गेल्या वर्षी कसोटी कर्णधार म्हणून पदोन्नती मिळाल्यापासून ते सलग ६ कसोटी गमावले होते. तसेच, पाकिस्तानची ११ सामन्यांपासूनची पराभवाची मालिका आता संपली आहे.
संबंधित बातम्या