Ajinkya Rahane recalled from the pavilion controversy : रणजी ट्रॉफीमध्ये मुंबई आणि जम्मू काश्मीर यांच्यात गुरुवारपासून मुंबईतील बीकेसी मैदानावर सामना खेळला जात आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी (२४ जानेवारी) जबरदस्त ड्रामा पाहायला मिळाला. ज्याची चाहत्यांनी कल्पनाही केली नसेल. कारण अंपायरने आऊट दिलेल्या आणि पॅव्हेलियनमध्ये परतलेल्या अजिंक्य रहाणे .याला बॅटिंगसाठी परत बोलावण्यात आले.
काही काळ मैदानावर काय चालले आहे ते कोणालाच समजले नाही. वास्तविक, अजिंक्य रहाणे हा जम्मू-काश्मीरचा यष्टिरक्षक कन्हैया वाधवन याच्या हाती झेलबाद झाला. यानंतर मुंबईचा कर्णधार पॅव्हेलियनमध्ये पोहोचला होता आणि पुढचा फलंदाज शार्दुल ठाकूर फलंदाजीला मैदानावर पोहोचलाही होता. पण पंच एस रवी आणि नवदीप सिंग सिद्धू यांनी चेंडू नो-बॉल घोषित केला.
यानंतर शार्दुल ठाकूरला थांबण्यास सांगण्यात आले आणि परत तंबूत पाठवण्यात आले, त्यानंतर रहाणे पुन्हा फलंदाजीला आला. ही घटना मुंबईच्या दुसऱ्या डावातील २५ व्या षटकात घडली. या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर वेगवान गोलंदाज उमर नझीर मीरने रहाणेला बाद केले.
विशेष म्हणजे, जेव्हा शार्दुल ठाकूरला थांबण्यास सांगितले गेले आणि त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले गेले, तेव्हा चाहत्यांना वाटले की शार्दुलला टाइम आउट केले गेले आहे. सामन्यातील समालोचकांनीही तेच सांगितले.
मात्र काही वेळातच रहाणे पुन्हा फलंदाजीसाठी मैदानात आला आणि परिस्थिती काहीशी स्पष्ट झाली.
क्रिकबझच्या वृत्तानुसार, यादरम्यान घडलेली आणखी एक विचित्र गोष्ट म्हणजे हा नो-बॉल स्क्रीनवर कधीही दाखवला गेला नाही. बीकेसी मैदानावरील टेलिव्हिजन प्रॉडक्शन टीमशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की त्यांना फुटेज मिळाली नाही ती ते थर्ड अंपायरकडे आहे. यावर थर्ड अंपायर नितीन गोयल म्हणाले की संवादाच्या अभावामुळे गोंधळ आणि विलंब झाला.
फलंदाज गोयल पुढे म्हणाले, "जेव्हा मी वॉकीटॉकीवर मैदानावरील अंपायरशी बोलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा अंपायर इतर दुसऱ्याच चॅनलवर होते. त्यामुळे मैदानावरील अंपायरशी बोलायला थोडा वेळ लागला.
संबंधित बातम्या