प्रतीक्षा संपली! अजिंक्य रहाणे फॉर्ममध्ये परतला, सुंदर कव्हर ड्राइव्ह मारून पूर्ण केलं अर्धशतक
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  प्रतीक्षा संपली! अजिंक्य रहाणे फॉर्ममध्ये परतला, सुंदर कव्हर ड्राइव्ह मारून पूर्ण केलं अर्धशतक

प्रतीक्षा संपली! अजिंक्य रहाणे फॉर्ममध्ये परतला, सुंदर कव्हर ड्राइव्ह मारून पूर्ण केलं अर्धशतक

Mar 11, 2024 06:30 PM IST

ajinkya rahane ranji trophy 2024 final : विदर्भाविरुद्ध अजिंक्य रहाणेने दुसऱ्या डावात शानदार चौकार लगावत आपले अर्धशतक पूर्ण केले. रहाणेने ८८ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. रणजी ट्रॉफी २०२४ मधील रहाणेचे हे दुसरे अर्धशतक आहे.

ajinkya rahane ranji trophy 2024 final प्रतीक्षा संपली! अजिंक्य रहाणे फॉर्ममध्ये परतला, सुंदर कव्हर ड्राइव्ह मारून पूर्ण केलं अर्धशतक
ajinkya rahane ranji trophy 2024 final प्रतीक्षा संपली! अजिंक्य रहाणे फॉर्ममध्ये परतला, सुंदर कव्हर ड्राइव्ह मारून पूर्ण केलं अर्धशतक (PTI)

Mumbai vs Vidarbha Ranji Trophy Final : अजिंक्य रहाणे अखेर फॉर्ममध्ये परतला आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर रहाणेने रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये दमदार अर्धशतक झळकावले आहे. रहाणेचे हे अर्धशतक अतिशय योग्य वेळी आले आहे. रणजी ट्रॉफी २०२४ च्या अंतिम सामन्यात विदर्भाविरुद्ध खेळताना मुंबईच्या कर्णधाराने अर्धशतक झळकावले आहे. रहाणेच्या अर्धशतकाच्या जोरावर मुंबईचा संघ जेतेपदाच्या लढतीत मजबूत स्थितीत पोहोचला आहे.

चौकार लगावत अर्धशतक पूर्ण

विदर्भाविरुद्ध अजिंक्य रहाणेने दुसऱ्या डावात शानदार चौकार लगावत आपले अर्धशतक पूर्ण केले. रहाणेने ८८ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. रणजी ट्रॉफी २०२४ मधील रहाणेचे हे दुसरे अर्धशतक आहे. रहाणेने सुंदर कव्हर ड्राईव्ह मारत आपले अर्धशतक पूर्ण केले.

रहाणे यंदाच्या मोसमात फॉर्मशी झुंजताना दिसला. मात्र, रहाणे योग्य वेळी फॉर्ममध्ये परतला आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत (११ मार्च) कर्णधार अजिंक्य रहाणे आणि मुशीर खान आपापली अर्धशतके पूर्ण करून क्रीजवर होते. रहाणेने १०९ चेंडूत ५८ तर मुशीर खानने १३५ चेंडूत ५१ धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे ४ चौकारांव्यतिरिक्त रहाणेने आपल्या खेळीदरम्यान एक षटकारही लगावला. आता मुंबईची सौराष्ट्रवर २६० धावांची आघाडी आहे. 

विदर्भाची बॅटिंग फ्लॉप ठरली

तत्पूर्वी, मुंबईचा पहिला डाव २२३ धावांवर आटोपला होता. प्रत्युत्तरात विदर्भाचा संपूर्ण संघ पहिल्या डावात अवघ्या १०५ धावांवर गारदा झाला. संघाच्या एकाही फलंदाजाला क्रीजवर उभे राहून मुंबईच्या गोलंदाजांचा सामना करता आला नाही. विदर्भाकडून यश राठोडने सर्वाधिक २७ धावा केल्या, तर अथर्व तायडेने २३ धावांचे योगदान दिले.

संघासाठी या मोसमात सर्वाधिक धावा करणारे ध्रुव शौरी आणि करुण नायर हे फलंदाज खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतले. गोलंदाजीत मुंबईकडून धवन कुलकर्णीने केवळ १५  धावा देत ३ बळी घेतले. तर शम्स मुलानी आणि तनुष कोटियन यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले.

मुंबई मजबूत स्थितीत

रणजी ट्रॉफी २०२४ च्या विजेतेपदाच्या सामन्यात मुंबई मजबूत स्थितीत असल्याचे दिसत आहे. मात्र, दुसऱ्या मुंबईची सुरुवात चांगली झाली नाही आणि पृथ्वी शॉ केवळ ११ धावा करून बाद झाला. त्याचवेळी भूपेन लालवानीही फलंदाजीत काही खास कमाल दाखवू शकला नाही आणि १८ धावा करून तो बाद झाला. यानंतर रहाणे आणि मुशीर खान यांनी सुत्रे हाती घेतली आणि संघाची धावसंख्या पुढे नेली. 

Whats_app_banner