मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IPL 2024 : अजिंक्य रहाणेनं दाखवली चतुराई आणि चपळाई... किंग कोहलीला असं बाद केलं

IPL 2024 : अजिंक्य रहाणेनं दाखवली चतुराई आणि चपळाई... किंग कोहलीला असं बाद केलं

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Mar 22, 2024 10:31 PM IST

Ajinkya Rahane And Rachin Ravindra Catch : अजिंक्य रहाणे आणि रचिन रवींद्र यांनी आरसीबीच्या विराट कोहलीचा शानदार झेल घेतला, ज्याचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे.

Rahane And Rachin Ravindra tooks Virat Kohli Catch Video : अजिंक्य रहाणेनं दाखवली चतुराई आणि चपळाई... किंग कोहलीला असं बाद केलं
Rahane And Rachin Ravindra tooks Virat Kohli Catch Video : अजिंक्य रहाणेनं दाखवली चतुराई आणि चपळाई... किंग कोहलीला असं बाद केलं

Rahane And Rachin Ravindra tooks Virat Kohli Catch Video : आयपीएल २०२४ चा (IPL 2024) पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांच्यात खेळला जात आहे. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या सामन्यात आरसीबीने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर कर्णधार फाफ डू प्लेसिसने त्यांना चांगली सुरुवात करून दिली.

पण डुप्लेसिस बाद झाल्यानंतर संघाला गळती लागली. यात आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहलीदेखील स्वस्तात बाद झाला. कोहलीने २० चेंडूत १ षटकाराच्या साह्याने २१ धावा केल्या.

कोहली षटकार मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला. विशेष म्हणजे, चेन्नईच्या एक नव्हे तर दोन खेळाडूंनी कोहलीचा झेल टिपला. सीमारेषेवर अजिंक्य रहाणेने चतुराई दाखवत कोहलीला पॅव्हेलियनमध्ये पाठवण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले.

रचिन रवींद्र आणि रहाणेने विराटला झेलबाद केले. रहाणे आणि रचिन रविंद्रने घेतलेल्या या झेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

वास्तविक, दीपक चहरच्या चेंडूवर विराट कोहलीने लेग साइडच्या दिशेने हवेत फटका खेळला. यानंतर चेंडू सीमारेषेकडे जाताना पाहून अजिंक्य रहाणे धावत गेला आणि स्लाइड करून झेल घेतला, पण स्लाईड केल्याने घसरत तो सीमारेषेच्या जवळ जाऊ लागला. तो सीमारेषेला स्पर्श करणार तेवढ्यात त्याने जवळच उभ्या असलेल्या रचिन रवींद्रच्या दिशेने चेंडू फेकला. रचिनने चेंडू पकडत झेल पूर्ण केला.

आता या आकर्षक झेलचा व्हिडीओ सोशल मीडियावर होत आहे. तसेच, चाहेत रहाणेच्या चतुराईचे कौतुक करत आहेत.

आरसीबीच्या १७३ धावा

आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना सीएसकेला १७४ धावांचे लक्ष्य दिले आहे. आरसीबीसाठी अनुज रावतने सर्वाधिक ४८ आणि दिनेश कार्तिकने ३८ धावा केल्या. तर मुस्तफिजुर रहमानने सीएसकेसाठी ४ विकेट मिळवले.

अनुज रावत आणि दिनेश कार्तिक यांनी ९५ धावा जोडून आरसीबीला १७० धावांचा टप्पा गाठून दिला. सीएसकेकडून मुस्तफिजुर रहमानने सर्वाधिक ४ विकेट घेतल्या.

तत्पूर्वी, या सामन्यात आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आरसीबीची सुरुवात चांगली झाली आणि कर्णधार डू प्लेसिससह विराट कोहलीने पहिल्या विकेटसाठी ४१ धावांची भागीदारी केली. डुप्लेसिसने चांगली फलंदाजी करत ३५ धावांच्या खेळीत ८ चौकार लगावले.

IPL_Entry_Point