माधुरी दीक्षित अजय जडेजाच्या प्रेमात पडली होती, अनेक वर्षांच्या नात्याचा अंत कसा झाला? वाचा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  माधुरी दीक्षित अजय जडेजाच्या प्रेमात पडली होती, अनेक वर्षांच्या नात्याचा अंत कसा झाला? वाचा

माधुरी दीक्षित अजय जडेजाच्या प्रेमात पडली होती, अनेक वर्षांच्या नात्याचा अंत कसा झाला? वाचा

Published Oct 17, 2024 04:52 PM IST

Ajay Jadeja And Madhuri Dixit Love Story : लोकप्रिय अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि एकेकाळचा सुपस्टार क्रिकेटर अजय जडेजा यांची भेट एका मॅगझीन फोटोशूट दरम्यान झाली होती. सुरुवातीला दोघांमध्ये मैत्री होती, नंतर त्यांच्या भेटीगाठी वाढत गेल्या आणि हळूहळू प्रेम फुलले.

माधुरी दीक्षित अजय जडेजाच्या प्रेमात पडली होती, अनेक वर्षांच्या नात्याचा अंत कसा झाला? वाचा
माधुरी दीक्षित अजय जडेजाच्या प्रेमात पडली होती, अनेक वर्षांच्या नात्याचा अंत कसा झाला? वाचा

क्रिकेट आणि बॉलीवूडचे नाते खूप जुने आहे. क्रिकेटपटू आणि बॉलीवूड अभिनेत्री यांच्यातील नाती नेहमीच चर्चेत असतात. यातील काही नाती अगदी लग्नापर्यंत पोहोचली. त्याचबरोबर काही नाती अशी होती की ज्यात प्रेम तर होते पण ते नाते लग्नापर्यंत पोहोचू शकले नाही. 

या यादीत भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू अजय जडेजा याच्या नावाचाही समावेश आहे. लोकप्रिय अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि एकेकाळचा सुपस्टार क्रिकेटर अजय जडेजा यांची भेट एका मॅगझीन फोटोशूट दरम्यान झाली होती. सुरुवातीला दोघांमध्ये मैत्री होती, नंतर त्यांच्या भेटीगाठी वाढत गेल्या आणि हळूहळू प्रेम फुलले. 

त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. माधुरीने अजयला बॉलिवूडमध्ये येण्यासाठी मदत केल्याचे बोलले जाते. त्याचवेळी माधुरीसोबतच्या वाढत्या जवळीकीचा अजय जडेजाच्या खेळावर परिणाम झाला आणि त्याची कामगिरी ढासळत गेली.

या दरम्यानच, १९९९ मध्ये अजय जडेजाचे नाव मॅच फिक्सिंगमध्ये आले होते. या प्रकरणी बीसीसीआयने त्याच्यावर ५ वर्षांची बंदी घातली. अजय जडेजाचे नाव अशा प्रकरणात आल्याने देशभरात त्याचे पुतळे जाळण्यात आले होते.

माधुरी दीक्षितच्या कुटुंबीयांनाही हे नाते मान्य नव्हते

यानंतर माधुरी दीक्षितने अजय जडेजाशी संबंध तोडले आणि अमेरिकेत जाऊन डॉक्टर श्रीराम नेने यांच्याशी लग्न केले. विशेष म्हणजे, अजय जडेजा आणि माधुरीचे नाते माधुरीच्या घरच्यांना मान्य नव्हते.

अजय जडेजाने जया जेटली यांची मुलगी आदितीशी लग्न केले

त्याचवेळी अजय जडजा याचे माधुरी दीक्षितसोबतचे नाते जडेजा कुटुंबीयांनाही पसंत नव्हते. दोघांच्या कुटुंबात खूप फरक होता, अजय जडेजा एका राजघराण्यातील व्यक्ती आहे, तर माधुरी दीक्षित एका सामान्य कुटुंबातील होती. 

अजय जडेजा नुकताच जामसाहेब बनला

यानंतर माधुरी आणि अजयच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आणि दोघांचे ब्रेकअप झाले. अजयपासून वेगळे झाल्यानंतर माधुरी दीक्षितने अमेरिकन डॉक्टर श्रीराम नेने यांच्याशी लग्न केले. त्याचवेळी अजय जडेजाने राजकारणी जया जेटली यांची मुलगी आदिती जेटलीसोबत लग्न केले.

अलीकडेच, नवानगरचे महाराज जामसाहेब यांनी अजय जडेजा याला आपला वारस म्हणून घोषित केले होते. विजयादशमीच्या दिवशी ही घोषणा करण्यात आली होती.

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या