मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND VS SA Final : आफ्रिकेचा लकी चार्म, ICC च्या स्पर्धेत एडन मार्करम पराभूत होत नाही! खतरनाक रेकॉर्ड पाहा

IND VS SA Final : आफ्रिकेचा लकी चार्म, ICC च्या स्पर्धेत एडन मार्करम पराभूत होत नाही! खतरनाक रेकॉर्ड पाहा

Jun 28, 2024 01:51 PM IST

Aiden Markram captaincy record in icc events : दक्षिण आफ्रिकेचा वरिष्ठ संघ प्रथमच विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. पण संघाच्या विद्यमान कर्णधाराने यापूर्वीही आफ्रिकेला विश्वविजेते बनवले आहे.

IND VS SA Final : आफ्रिकेचा लकी चार्म, ICC च्या स्पर्धेत एडन मार्करम पराभूत होत नाही! खतरनाक रेकॉर्ड पाहा
IND VS SA Final : आफ्रिकेचा लकी चार्म, ICC च्या स्पर्धेत एडन मार्करम पराभूत होत नाही! खतरनाक रेकॉर्ड पाहा (PTI)

टी-20 विश्वचषक २०२४ अनेक कारणांमुळे खास बनला आहे. विशेषत: दक्षिण आफ्रिकेने यावेळी सर्वाधिक चर्चा मिळवली आहे. कारण दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्यांदाच विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

आफ्रिकन संघाच्या कामगिरीचे बरेच श्रेय कर्णधार एडन मार्करामलाही जाते. मार्करामला दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा लकी चार्म देखील म्हटले जाऊ शकते कारण फार कमी लोकांना माहीत असेल की त्याने आपल्या नेतृत्वाखाली आफ्रिकेला पूर्वी एकदा वर्ल्ड चॅम्पियन बनवले आहे.

कर्णधार म्हणून अंडर-१९ विश्वचषक जिंकला

एडन मार्करमने २०१४ मध्ये अंडर-१९ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेला चॅम्पियन बनवले होते. २०१४ विश्वचषक राऊंड-रॉबिन आणि नॉकआउट फॉरमॅटमध्ये आयोजित करण्यात आला होता.

आफ्रिका प्रथम त्या स्पर्धेच्या गट टप्प्यात अपराजित राहिली आणि नंतर उपांत्यपूर्व आणि उपांत्य फेरीत पोहचली. शेवटी विजेतेपदाच्या लढतीत मार्करमच्या नेतृत्वात आफ्रिकेने पाकिस्तानचा ६ गडी राखून पराभव केला.

त्या विश्वचषकात कर्णधार एडन मार्करामने दक्षिण आफ्रिकेसाठी सर्वाधिक धावा केल्या होत्या. मार्करमने ६ सामने खेळून १२३.३३ च्या उत्कृष्ट सरासरीने ३७० धावा केल्या.

T20 विश्वचषक २०२४ मध्येही चमकदार कामगिरी

एडन मार्कराम २०२४ च्या T20 विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली आफ्रिकेने पुन्हा एकदा झेंडा फडकवायला सुरुवात केली आहे. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने आतापर्यंत खेळलेले सर्व ८ सामने जिंकले आहेत. दक्षिण आफ्रिकेने प्रथम गट टप्प्यातील सर्व ४ सामने जिंकले, त्यानंतर सुपर-८ टप्प्यात सर्व ३ संघांना पराभूत केले आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला. आता त्यांच्या संघाने उपांत्य फेरीत अफगाणिस्तानचा ९ गडी राखून पराभव करून अंतिम फेरी गाठली आहे.

WhatsApp channel