मी हँडसम दिसतो म्हणून मला संघाबाहेर काढलं, कोहलीसारखा दिसणाऱ्या क्रिकेटपटूचा वरिष्ठांवर आरोप
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  मी हँडसम दिसतो म्हणून मला संघाबाहेर काढलं, कोहलीसारखा दिसणाऱ्या क्रिकेटपटूचा वरिष्ठांवर आरोप

मी हँडसम दिसतो म्हणून मला संघाबाहेर काढलं, कोहलीसारखा दिसणाऱ्या क्रिकेटपटूचा वरिष्ठांवर आरोप

Jan 26, 2025 04:24 PM IST

Ahmed Shehzad Pakistan Cricket : चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी पाकिस्तानचा प्रसिद्ध खेळाडू अहमद शहजाद याने आपल्या संघातील वरिष्ठ खेळाडूंवर आरोप केले आहेत. अहमद शहजादला त्याच्या लूकसाठी 'पाकिस्तानचा विराट कोहली' असेही म्हटले जाते.

मी हँडसम दिसतो म्हणून मला संघाबाहेर काढलं, कोहलीसारखं दिसणाऱ्या क्रिकेटपटूचा वरिष्ठांवर आरोप
मी हँडसम दिसतो म्हणून मला संघाबाहेर काढलं, कोहलीसारखं दिसणाऱ्या क्रिकेटपटूचा वरिष्ठांवर आरोप

Ahmed Shehzad On Pakistan Cricket : टीम इंडियाचा महान फलंदाज विराट कोहली त्याच्या फलंदाजीसोबतच फिटनेस आणि त्याच्या लूकसाठी ओळखला जातो. पाकिस्तानी खेळाडू अहमद शहजाद याची तुलना त्याच्या लूकमुळे विराटसोबत केली जाते. शहजादला 'पाकिस्तानचा विराट कोहली' असेही म्हणतात. मात्र आता या खेळाडूने आपल्या वरिष्ठ आणि माजी खेळाडूंवर मोठे आरोप केले आहेत.

आपल्या लूकमुळे चर्चेत आलेला अहमद शहजाद म्हणतो, की त्याच्या चांगल्या लूकमुळे माजी खेळाडू तसेच, वरिष्ठ खेळाडू त्याचा तिरस्कार करत होते.

शहजादने सहकारी खेळाडूंवर आरोप केले

३३ वर्षीय अहमद शहजाद हा पाकिस्तानकडून सर्व फॉरमॅटमध्ये खेळला आहे. तो बराच काळ राष्ट्रीय संघातून बाहेर आहे. त्याच्या कारकिर्दीच्या शिखरावर असताना, अहमदने त्याची फलंदाजी आणि लूक या दोहोंसाठी खूप चर्चा मिळवली होती. मात्र या काळात त्याला सहकारी खेळाडूंकडून चांगला प्रतिसाद मिळाला नाही.

या मुद्द्याबाबत अहमदने अभिनेता अहमद अली बट याच्या पॉडकास्टवर सांगितले की, ‘सुंदर दिसणे मला खूप महागात पडले आहे. आमच्या क्षेत्रात जर तुम्ही चांगले दिसत असाल किंवा चांगले कपडे परिधान करायचे तुम्हाला माहीत असेल तर वरिष्ठ खेळाडू तुमचा तिरस्कार करण्या सुरुवात करतात.’

शहजाद पुढे म्हणाला, "पाकिस्तान संघात मी स्वतः टार्गेट झालो आहे. मी येथे स्वतःचा बचाव करत नाही, परंतु इतरांनाही या समस्येचा सामना करावा लागला आहे. जर तुमची फॅन फॉलोइंग वाढली आणि लोक तुमचे कौतुक करत असतील, तर काही सीनियर खेळाडूंसाठी हे कठीण होते."

 “मी छोट्या ठिकाणाहून आलो आहे. मी अनारकली, लाहोर येथे राहतो आणि जेव्हा मला ओळख मिळाली, तेव्हा मी स्वतःला तयार करण्याचे आणि माझे व्यक्तिमत्त्व सुधारण्याचे काम केले. पण यामुळे पाकिस्तानी संघात अनेक समस्या निर्माण झाल्या, ' असेही अहमद शहजाद याने सांगितले.

अहमद शहजादचे क्रिकेट करिअर

अहमद शहजादने २००९ मध्ये एकदिवसीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तर त्याच्या कसोटी कारकिर्दीला २०१३ साली सुरुवात झाली. शहजादने शेवटची कसोटी आणि वनडे २०१७ मध्ये खेळली होती.

तर २०१९ मध्ये त्याने पाकिस्तानकडून शेवटचा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला. त्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये मिळून १५३ सामने खेळले आणि ४ हजारांहून अधिक धावा केल्या. या दरम्यान, त्याने १० शतके (कसोटीमध्ये ३, एकदिवसीय सामन्यात ६ आणि टी-20I मध्ये एक) झळकावली.

Whats_app_banner

संबंधित बातम्या