मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  या क्रिकेटपटूच्या मुलाने केला अर्जुन तेंडुलकरसारखा पराक्रम, लवकरच इंग्लंडच्या संघात दिसणार

या क्रिकेटपटूच्या मुलाने केला अर्जुन तेंडुलकरसारखा पराक्रम, लवकरच इंग्लंडच्या संघात दिसणार

Jun 12, 2024 05:30 PM IST

Rocky Flintoff In England U19 Squad : अर्जुन तेंडुलकरप्रमाणेच आणखी एका क्रिकेटपटूचा मुलगा श्रीलंकेतून अंडर-१९ कारकीर्द सुरू करणार आहे. अँड्र्यू फ्लिंटॉफचा मुलगा रॉकी फ्लिंटॉफ इंग्लंडकडून अंडर-१९ क्रिकेट खेळणार आहे.

या क्रिकेटरच्या मुलाने केला अर्जुनसारखा पराक्रम, लवकरच इंग्लंडच्या संघात दिसणार
या क्रिकेटरच्या मुलाने केला अर्जुनसारखा पराक्रम, लवकरच इंग्लंडच्या संघात दिसणार

Rocky Flintoff In England U19 Squad : मास्टर ब्लास्टर फलंदाज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने आपल्या अंडर-१९ कारकिर्दीला श्रीलंका दौऱ्यापासून सुरुवात केली. २०१८ मध्ये त्याने पदार्पण केले, परंतु त्याला अद्याप वरिष्ठ स्तरावरील राष्ट्रीय संघाचे तिकीट मिळालेले नाही. तो मुंबई सोडून गोव्यात पोहोचला आणि तिथून क्रिकेट खेळत आहे. तर आयपीएलमध्ये तो मुंबई इंडियन्सचा भाग आहे.

आता अर्जुन तेंडुलकरप्रमाणेच आणखी एका क्रिकेटपटूचा मुलगा श्रीलंकेतून अंडर-१९ कारकीर्द सुरू करणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

रॉकी फ्लिंटॉफची अंडर-१९ संघात निवड

होय, हा इंग्लंडचा माजी अष्टपैलू खेळाडू अँड्र्यू फ्लिंटॉफचा मुलगा रॉकी फ्लिंटॉफ आहे, ज्याची श्रीलंकेविरुद्धच्या आगामी ३ वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंडच्या अंडर-१९ संघात निवड झाली आहे.

अवघ्या १६ व्या वर्षी रॉकीची अंडर १९ संघात निवड झाली आहे. रॉकी या मोसमात लँकेशायरसाठी सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करत आहे.

रॉकी फ्लिंटॉफने वाढदिवसाच्या अवघ्या दोन दिवसांनी संघासाठी पदार्पण केले. तो ज्या शैलीत खेळत आहे, ते पाहता अर्जुन तेंडुलकरच्या आधी तो आपल्या देशासाठी वरिष्ठ पातळीवर खेळताना दिसू शकतो.

यापूर्वी एप्रिलमध्ये रॉकीने एजबॅस्टन येथे वॉर्विकशायर सेकंड इलेव्हनविरुद्ध पहिले शतक झळकावले होते. अंडर-१९ संघात अनेक खेळाडूंचा समावेश आहे. संघाचे नेतृत्व एसेक्सचा अष्टपैलू खेळाडू ल्यूक बेनकेनस्टाईन याच्याकडे आहे. ल्यूक बेनकेनस्टाईन हा लँकेशायरचे मुख्य प्रशिक्षक आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज डेल बेनकेनस्टाईन यांचा मुलगा आहे. यानंतर इंग्लंडचा फिरकीपटू रेहान अहमदचा भाऊ फरहान अहमदही ऑफस्पिनर म्हणून संघात आहे. नॉटिंगहॅमशायरसोबत फरहानने नुकताच पहिला व्यावसायिक करार केला.

WhatsApp channel