मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  World Cup Final : पराभवानंतर भारताच्या ड्रेसिंग रूममध्ये काय घडलं? रोहित आणि टीममध्ये काय संवाद झाला? पाहा

World Cup Final : पराभवानंतर भारताच्या ड्रेसिंग रूममध्ये काय घडलं? रोहित आणि टीममध्ये काय संवाद झाला? पाहा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Nov 20, 2023 12:13 PM IST

World Cup Final Indian Cricket Team Dressing Room : वर्ल्डकप फायनलमध्ये भारतीय संघाचा पराभव झाला. यामुळे कोट्यवधी भारतीय चाहत्यांचा स्वप्नांचा चुराडा झाला. सामन्यानंतर, बीसीसीआयने ड्रेसिंग रूममधील वातावरणाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये खेळाडू दुःखात बुडलेले दिसत आहेत.

World Cup Final
World Cup Final

क्रिकेटचा महाकुंभ संपला आहे. भारताच्या पराभवाने कोट्यवधी भारतीयांच्या स्वप्नांचा चुराडा झाला. रोहित सेनेने सलग १० सामने जिंकून अंतिम फेरी गाठली. पण फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा धुव्वा उडवला. आता या पराभवातून सावरायला टीम इंडिया आणि चाहत्यांना बरीच वर्षे लागतील.

ट्रेंडिंग न्यूज

वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचा असा पराभव होईल. याची कल्पनाही कोणी केली नसेल. या विश्वचषकावर भारताचे नाव कोरले गेले आहे. असे वाटत होते, पण कांगारूंनी या सर्वांवर पाणी फेरले. ऑस्ट्रेलियाने आयसीसी वनडे विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारताचा दुसऱ्यांदा पराभव केला. याआधी २००३ च्या वर्ल्डकप फायनलमध्येही ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला होता.

या पराभवाचे दु:ख कर्णधार रोहित शर्माला आणि इतर खेळाडूंना सहन झाले नाही. पराभवानंतर कॅप्टन रोहितसह भारतीय संघ ड्रेसिंग रूममध्ये पोहोचला. त्यावेळी ड्रेसिंग रूममध्ये प्रचंड शांतता पसरली होती.

प्रत्येक सामन्याप्रमाणे या सामन्यानंतरही फिल्डिंगसाठी मेडल प्रदान करण्याचा कार्यक्रम झाला. पण यावेळी खेळाडूंच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता. सर्व चेहरे निराश दिसत होते.

अशा परिस्थितीत, फिल्डिंग कोच टी दिलीप यांनी खेळाडूंचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या आवाज जड पडलेला होता. विराट कोहलीला फिल्डिंगचे मेडल देण्यात आले. 

यावेळी दिलीप म्हणाले की, मित्रांनो, मला माहित आहे की हे कठीण आहे आणि आपल्या सर्वांना वेदना जाणवत आहेत, आपण सर्व काही ठीक केले पण निकाल आपल्या बाजूने लागला नाही.

या स्पर्धेदरम्यान आपण काही उत्कृष्ट झेल घेतले, परंतु मला खरोखर आवडले ते म्हणजे मैदानावरील आपल्यातील सौहार्द. सर्वांनी ज्या प्रकारे एकमेकांना साथ दिली, ते अद्भूत होते'.

यानंतर टी दिलीप यांनी विराट कोहलीला उत्कृष्ट फिल्डर म्हणून घोषित केले, त्यानंतर रवींद्र जडेजाने कोहलीला पदक दिले. कोहलीच्या नावाची घोषणा करताना दिलीप म्हणाले, तो एक महान खेळाडू आहे. जेव्हा तो मैदानावर जातो तेव्हा तो उत्कृष्ट मापदंड सेट करतो आणि जादू निर्माण करतो".

WhatsApp channel
Cricket News मधील सर्व ताज्या घडामोडी Live Score सह Marathi News आणि प्रत्येक सामन्यागणिक बदलणारा पाहा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर