SL vs AFG : श्रीलंकन क्रिकेटची वाईट अवस्था, अफगाणिस्तानने २४ तासांत दोनदा हरवलं, एशियन गेम्समधून बाहेर
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  SL vs AFG : श्रीलंकन क्रिकेटची वाईट अवस्था, अफगाणिस्तानने २४ तासांत दोनदा हरवलं, एशियन गेम्समधून बाहेर

SL vs AFG : श्रीलंकन क्रिकेटची वाईट अवस्था, अफगाणिस्तानने २४ तासांत दोनदा हरवलं, एशियन गेम्समधून बाहेर

Updated Oct 04, 2023 10:54 AM IST

Afghanistan vs Sri Lanka T20 HIGHLIGTS : अफगाणिस्तान क्रिकेट संघ 2023 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत उपांत्य फेरीत पोहोचला आहे. अफगाणिस्तानने उपांत्यपूर्व फेरीत श्रीलंकेचा पराभव करत अंतिम-४ मध्ये प्रवेश केला आहे.

Afghanistan vs Sri Lanka T20
Afghanistan vs Sri Lanka T20

Afghanistan vs Sri Lanka ASIAN GAMES 2023 : एशियन गेम्स 2023 च्या पुरुष क्रिकेट स्पर्धेच्या तिसऱ्या उपांत्यपूर्व फेरीत अफगाणिस्तानने श्रीलंकेचा ८ धावांनी पराभव केला. या विजयासह अफगाणिस्तान संघाने उपांत्य फेरी गाठली आहे. विशेष बाब म्हणजे गेल्या २४ तासांत अफगाणिस्तानने श्रीलंकेला दोनदा पराभूत केले आहे. 

मंगळवारी (३ ऑक्टोबर) अफगाणिस्तानने वर्ल्ड कप 2023 च्या सराव सामन्यातही श्रीलंकेचा पराभव केला होता.

एशियन गेम्सच्या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेच्या कर्णधाराचा हा निर्णय योग्य ठरला आणि अफगाणिस्तानचा सलामीवीर सैदीकुल्लाह अटल केवळ एका धावेवर पॅव्हेलियनमध्ये परतला. मात्र, यानंतर मोहम्मद शहजाद (२०), नूर अली झदरन (५१) आणि शाहीदुल्लाह (२३) यांनी छोटे पण महत्त्वाचे डाव खेळून अफगाणिस्तानची धावसंख्या १०० च्या जवळ नेली.

मात्र, येथून अफगाणिस्तानने वेगाने विकेट गमावण्यास सुरुवात केली. एकेकाळी ९२ धावांवर २ विकेट्स अशी भक्कम दिसत असलेल्या अफगाण संघाने अवघ्या २४ धावांची भर घालून शेवटच्या ८ विकेट्स गमावल्या. परिणामी अफगाणिस्तानचा संपूर्ण संघ १९व्या षटकात ११६ धावांवर सर्वबाद झाला. पण या छोट्या धावसंख्येवरही अफगाणिस्तानने विजय मिळवला.

अफगाण गोलंदाजांचा धमाका

अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच चोख गोलंदाजी करत श्रीलंकेच्या फलंदाजांना वेगाने धावा करण्याची संधी दिली नाही. श्रीलंकेने ठराविक अंतराने विकेट गमावल्या. एकेकाळी श्रीलंकेचा संघ ८.१ षटकांत ६०/३ धावसंख्येसह चांगल्या स्थितीत होता, पण येथून श्रीलंकेचा डाव पत्त्यांप्रमाणे कोसळला आणि संपूर्ण संघ १०८ धावांत ऑलआऊट झाला. अफगाणिस्तानकडून गुलबदिन नायब आणि कैस अहमद यांनी ३-३ बळी घेतले.

पाकिस्तानसोबत होणार उपांत्य फेरीचा सामना  

एशियन गेम्स 2023 च्या उपांत्य फेरीत अफगाणिस्तानचा संघ आता पाकिस्तानला भिडणार आहे. हाँगकाँगचा पराभव करत पाकिस्तानने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. दुसरीकडे, दुसऱ्या उपांत्य फेरीत भारताचा सामना बांगलादेश आणि मलेशिया यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीतील विजेत्याशी होईल.

Whats_app_banner

संबंधित बातम्या