PAK vs AFG ODI : अफगाणिस्तान-पाकिस्तानी फॅन्समध्ये पुन्हा राडा, स्टेडियममध्ये प्रचंड गोंधळ
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  PAK vs AFG ODI : अफगाणिस्तान-पाकिस्तानी फॅन्समध्ये पुन्हा राडा, स्टेडियममध्ये प्रचंड गोंधळ

PAK vs AFG ODI : अफगाणिस्तान-पाकिस्तानी फॅन्समध्ये पुन्हा राडा, स्टेडियममध्ये प्रचंड गोंधळ

Aug 27, 2023 11:36 AM IST

Afghanistan Pakistan fans fight : पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्यादरम्यान राडा होण्याची ही काही पहिली वेळ नाही, गेल्यावर्षीच्या आशिया चषकातही स्टेडियममध्ये दोन्ही संघांच्या समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला होता.

Afghanistan Pakistan fans fight
Afghanistan Pakistan fans fight

pak vs afg 3rd odi match scorecard : आशिया कपआधी पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन वनडे सामन्यांची मालिका खेळली गेली. या मालिकेतील तिसऱ्या सामन्यादरम्यान पाकिस्तान-आफगाणिस्तान संघांच्या प्रेक्षकांमध्ये राडा झाला. स्टँडमधील प्रेक्षकांच्या वादाचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडिओनुसार, कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियममध्ये पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील तिसरा वनडे खेळला जात असताना दोन्ही देशांच्या समर्थकांमध्ये राडा झाला. सामना पाहण्यासाठी आलेल्या श्रीलंकन ​​क्रिकेट चाहत्यांनी पाकिस्तानच्या समर्थनार्थ संघाचे झेंडे आणि टोप्या परिधान केल्या होत्या. त्याचवेळी एक अफगाण समर्थकही हातात आपल्या देशाचा झेंडा घेऊन त्या श्रीलंकन ​​क्रिकेटला काहीतरी बोलताना दिसत आहे. काहीवेळ दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला, मात्र त्यानंतर प्रकरण शांत झाले.

दरम्यान, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्यादरम्यान राडा होण्याची ही काही पहिली वेळ नाही, गेल्यावर्षीच्या आशिया चषकातही स्टेडियममध्ये दोन्ही संघांच्या समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला होता.

अफगाणिस्तानचा ५९ धावांनी पराभव

तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानचा ५९ धावांनी पराभव केला. या विजयासह पाकिस्तानी संघाने मालिका ३-० ने जिंकली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने निर्धारित ५० षटकात ८ गडी गमावून २६८ धावा केल्या. पाकिस्तानकडून कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी अर्धशतकी खेळी केली.

प्रत्युत्तरात अफगाणिस्तानची फलंदाजी पूर्णपणे ढासळलेली दिसत होती. आघाडीचे फलंदाज आपल्या लयीत दिसले नाहीत. खालच्या फळीत मुजीब उर रहमानने संघाला सावरण्याचा प्रयत्न नक्कीच केला पण त्याला इतर फलंदाजांची साथ मिळू शकली नाही. अफगाणिस्तानसाठी मुजीबने २६ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले.

अफगाणिस्तासाठी सर्वात जलद अर्धशतक

एकदिवसीय क्रिकेटमधील अफगाणिस्तानसाठी हे सर्वात जलद अर्धशतक आहे. ३७ चेंडूत ६४ धावा करून मुजीब बाद झाला. या खेळीत त्याने ५ चौकार आणि ५ षटकारही लगावले. अशाप्रकारे लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा संघ ४८.४ षटकांत २०९ धावांवर गारद झाला.

Whats_app_banner