AFG vs NZ : पुन्हा येथे येणार नाही… ग्रेटर नोएडाची 'खराब व्यवस्था' पाहून अफगाणिस्तान संघाची संघाची संतप्त प्रतिक्रिया-afghanistan cricket team frustrated after day one of test match washed out due to wet out field in greater noida vs nz ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  AFG vs NZ : पुन्हा येथे येणार नाही… ग्रेटर नोएडाची 'खराब व्यवस्था' पाहून अफगाणिस्तान संघाची संघाची संतप्त प्रतिक्रिया

AFG vs NZ : पुन्हा येथे येणार नाही… ग्रेटर नोएडाची 'खराब व्यवस्था' पाहून अफगाणिस्तान संघाची संघाची संतप्त प्रतिक्रिया

Sep 10, 2024 10:51 AM IST

एक दिवस अगोदर मोठा पाऊस पडला होता, त्यामुळे मैदाना ओले झाले होते आणि नंतर ते कोरडे होऊ शकले नाही. ग्रेटर नोएडाच्या या 'खराब व्यवस्थे'मुळे अफगाणिस्तानचा संघ अजिबात खूश दिसला नाही.

Greater Noida: Groundsmen cover the Greater Noida Sports Complex ground during rains on the eve of the one-off Test cricket match between New Zealand and Afghanistan, in Greater Noida, Sunday, Sept. 8, 2024. (PTI Photo/Kamal Kishore) (PTI09_08_2024_000130B)
Greater Noida: Groundsmen cover the Greater Noida Sports Complex ground during rains on the eve of the one-off Test cricket match between New Zealand and Afghanistan, in Greater Noida, Sunday, Sept. 8, 2024. (PTI Photo/Kamal Kishore) (PTI09_08_2024_000130B) (PTI)

अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील एकमेव कसोटी ग्रेटर नोएडा येथे खेळली जात आहे. सोमवारी (९ सप्टेंबर) सुरू झालेल्या सामन्याचा पहिला दिवस ओल्या आउटफिल्डमुळे रद्द करण्यात आला. पहिल्या दिवशी पावसाचा एक थेंबही पडला नाही, तरी पहिल्या दिवसाचा सामना रद्द करण्यात आला.

वास्तविक, एक दिवस अगोदर मोठा पाऊस पडला होता, त्यामुळे मैदाना ओले झाले होते आणि नंतर ते कोरडे होऊ शकले नाही.

ग्रेटर नोएडाच्या या 'खराब व्यवस्थे'मुळे अफगाणिस्तानचा संघ अजिबात खूश दिसला नाही. 'माध्यमांशी बोलताना अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ते पुन्हा इथे खेळायला येणार नाही. याशिवाय अधिकाऱ्याने सांगितले की त्यांची पहिली पसंती ग्रेटर नोएडा नव्हे तर लखनौला होती.

अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, "स्थळाचे संपूर्ण खराब व्यवस्थापन आणि खराब प्रशिक्षण सुविधांचा अभाव यामुळे अफगाणिस्तानचे क्रिकेटपटू थोडे निराश आहेत. हा मोठा गोंधळ आहे. आम्ही येथे परत येणार नाही."

पहिल्या दिवसाचा खेळ रद्द

ग्रेटर नोएडा येथे अफगाणिस्तान-न्यूझीलंड कसोटीचा पहिला दिवस ओल्या मैदानामुळे रद्द करण्यात आला. सामन्याच्या दिवशी पाऊस पडला नाही. सामना सुरू होण्याच्या एक दिवस आधी पाऊस पडला होता, त्यामुळे मैदान ओले झाले होते. हे ओले मैदान कोरडे होऊ शकले नाही आणि पहिला दिवस कोणत्याही खेळाशिवाय संपवावा लागला.

या मैदानावरील पहिलाच कसोटी सामना

अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात खेळली जाणारी कसोटी ही ग्रेटर नोएडा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या मैदानावर होणारी पहिली कसोटी आहे. यापूर्वी या मैदानावर टी-20 आणि एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. मात्र, कसोटी सामन्याच्या दृष्टिकोनातून हे मैदान फ्लॉप असल्याचे दिसून आले.

मैदानावरील गैरसोयींनी सर्वांची निराशा केली. आता दुसऱ्या दिवसाचा खेळ कोणत्याही व्यत्ययाशिवाय होऊ शकेल, अशी अपेक्षा आहे.

Whats_app_banner