मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  कमी धावसंख्या, पावसाचा अडथळा, विकेटनंतर जल्लोष, मिस फिल्डनंतर निराशा... अफगाणिस्तान-बांगलादेश सामना चाहते विसरणार नाहीत

कमी धावसंख्या, पावसाचा अडथळा, विकेटनंतर जल्लोष, मिस फिल्डनंतर निराशा... अफगाणिस्तान-बांगलादेश सामना चाहते विसरणार नाहीत

Jun 25, 2024 12:28 PM IST

Afghanistan Cricket Team : अफगाणिस्तानने कमी स्कोअरच्या थ्रिलरमध्ये बांगलादेशचा पराभव करून प्रथमच T20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. या ऐतिहासिक विजयानंतर अफगाण संघाच्या आनंदाला सीमाच उरली नाही. कुणी मैदानात धावत होते तर कुणाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते.

कमी धावसंख्या, पावसाचा अडथळा, विकेटनंतर जल्लोष, मिस फिल्डनंतर निराशा... अफगाणिस्तान-बांगलादेश सामना  चाहते विसरणार नाहीत
कमी धावसंख्या, पावसाचा अडथळा, विकेटनंतर जल्लोष, मिस फिल्डनंतर निराशा... अफगाणिस्तान-बांगलादेश सामना चाहते विसरणार नाहीत

Afg vs Ban t20 World cup 2024 : भारताने सोमवारी (२४ जून) रात्री ऑस्ट्रेलियावर मिळवलेला विजय आज (२५ जून) सकाळी पूर्ण झाला. कारण अफगाणिस्तानने बांगलादेशचा पराभव करून पहिल्यांदाच टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आणि घमेंडखोर ऑस्ट्रेलियन संघ स्पर्धेतून बाहेर पडला.

किंग्सटाउनच्य अर्नोस व्हॅले ग्राउंडवर अफगाण पठाण खेळत होते, पण हृदयाचे ठोके संपूर्ण भारताच्या वाढले होते. प्रत्येक विकेटवर सेलिब्रेशन. प्रत्येक मिस फील्डवर वेदना आणि निराशा जाणवत होती.

रोलर कोस्टरप्रमाणे चढ-उतारांनी भरलेला सामना कधी बांगलादेशकडे तर कधी अफगाणिस्तानच्या पारड्यात झुकलेला वाटायचा. लो स्कोअरिंग गेम, पावसाचा अडथळा आणि डकवर्थ लुईसचा नियम यामुळे सामन्याचा थरार शेवटपर्यंत टिकून होता.

ट्रेंडिंग न्यूज
AFG VS BAN
AFG VS BAN (ICC)

बांगलादेशच्या पराभवामुळे बलाढ्य ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाहेर झाला. अफगाणिस्तानच्या या विजयाचा नायक त्यांचा कर्णधार राशिद खान ठरला, राशीदने आधी फलंदाजीत १० चेंडूत ३ षटकारांसह नाबाद १९ धावा कुटल्या. नंतर गोलंदाजीत ४ षटकांत केवळ २३ धावा देऊन ४ मौल्यवान विकेट घेतल्या.

सामन्याचा निकाल काय लागेल हे शेवटच्या षटकापर्यंत कोणालाच माहीत नव्हते. बांगलादेश सतत विकेट गमावत होता, पण धावा खूपच कमी होत्या. सामना दोन्ही बाजूने जाऊ शकला असता. अशा थरारक सामन्यात अफगाणिस्तानने उपांत्य फेरी गाठून इतिहास रचला, तेव्हा अफगाणिस्तानचे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला आपले आनंदाश्रू आवरता आले नाहीत.

नवीन उल हकच्या गोलंदाजीवर मुस्तफिजूर रहमान पायचीत झाल्यानंतर सर्व अफगाण खेळाडू मैदानावर सैरावैरा धावत सुटले. या सर्व घटनांमुळे अफगाणिस्तान आणि बांगलादेश सामना शतकानुशतके स्मरणात राहील.

AFG VS BAN
AFG VS BAN (ICC)

सेमी फायनलचे वेळापत्रक

दक्षिण आफ्रिका वि. अफगाणिस्तान

२७ जून, सकाळी ६ वाजता, त्रिनिदाद

इंग्लंड वि. भारत

२७ जून, रात्री ८ वाजता, गयाना

अफगाणस्तान-बांगलादेश सामन्यात काय घडलं?

अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ७ बाद ११५ धावा केल्या होत्या. सेमी फायनल गाठण्यासाठी त्यांना हा सामना जिंकावाच लागणार होता. अशा स्थितीत अफगाण गोलंदाजांनी कमाल केली. त्यांनी ११५ धावांच्या लक्ष्याचा यशस्वीपणे बचाव केला आणि सामना जिंकत सेमी फायनलचे तिकिट मिळवले.

बांगलादेशच्या डावात पाऊस आला त्यामुळे त्यांच्या डावाचे एक षटक कमी करण्यात आले. बांगलादेशकडून लिटन दास अर्धशतक (५४) करून शेवटपर्यंत क्रीजवर होता, पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. अफगाणिस्तानकडून नवीन उल हकने २६ धावात ४ तर राशीद खानने २३ धावात ४ विकेट घेतले.

WhatsApp channel