मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Afghanistan Fans : अफगाणिस्तानच्या विजयाचं जंगी सेलिब्रेशन, चाहते रस्त्यावर उतरले, तुफान आतषबाजी

Afghanistan Fans : अफगाणिस्तानच्या विजयाचं जंगी सेलिब्रेशन, चाहते रस्त्यावर उतरले, तुफान आतषबाजी

Jun 23, 2024 03:10 PM IST

Afghanistan Cricket Fans Celebration : अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने काही फोटो शेअर केला आहेत. या फोटोमध्ये अफगाण चाहते रस्त्यावर फटाके फोडताना दिसत आहेत.

Afghanistan Fans : अफगाण पठाणांचा कांगारूंना दणका, अफगाणिस्तानात चाहत्यांची रस्त्यांवर तुफान गर्दी आणि आतषबाजी
Afghanistan Fans : अफगाण पठाणांचा कांगारूंना दणका, अफगाणिस्तानात चाहत्यांची रस्त्यांवर तुफान गर्दी आणि आतषबाजी

Afghanistan Cricket Team Fans Viral : टी-20 वर्ल्डकप २०२४ च्या सुपर ८ फेरीत अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाला दणका दिला. रविवारी (२३ जून) अफगाणिस्तानने कांगारूंचा २१ धावांनी पराभव केला. अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना १४८ धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघ १२७ धावांवर सर्वबाद झाला.

ऑस्ट्रेलियाच्या पराभवामागे काही महत्त्वाची कारणे होती. त्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्याची बॅटिंग लाईन फ्लॉप झाली. सलामीवीर ट्रॅव्हिस हेड आणि डेव्हिड वॉर्नर अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकले नाहीत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अफगाणिस्तानचा ऑस्ट्रेलियावर पहिला विजय आहे.

ट्रेंडिंग न्यूज

या विजयानंतर राशिद खानच्या नेतृत्वाखालील अफगाणिस्तान संघाच्या खेळाडूंनी जल्लोष साजरा केला. तसेच अफगाणिस्तान क्रिकेटचे चाहतेही त्यांच्या संघाच्या विजयाचा जल्लोष साजरा करत आहेत. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये अफगाणचे चाहते घराबाहेर पडून रस्त्यावर फटाके फोडताना दिसत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये लोकांची मोठी गर्दी दिसत आहे.

अफगाणिस्तानात विजयाचा तुफान जल्लोष

ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर अफगाणिस्तान क्रिकेट संघाचे खेळाडू आणि चाहते आनंदी आहेत. खेळाडूंव्यतिरिक्त चाहतेही सेलिब्रेशनच्या मूडमध्ये आहेत. अफगाण चाहत्यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याशिवाय सोशल मीडिया यूजर्स कमेंट करून आपला फीडबॅक देत आहेत.

प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या अफगाणिस्तानने २० षटकात ६ विकेट गमावत १४८ धावा केल्या. अफगाणिस्तानकडून रहमानउल्ला गुरबाजने ४९ चेंडूत ६० धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत ४ चौकार आणि ४ षटकार मारले. याशिवाय इब्राहिम झद्रानने ४८ चेंडूत ५१ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत ६ चौकार मारले. रहमानउल्ला गुरबाज आणि इब्राहिम झद्रान यांनी पहिल्या विकेटसाठी विक्रमी ११८ धावांची भागीदारी केली.

अफगाणिस्तानच्या १४८ धावांना प्रत्युत्तर देताना ऑस्ट्रेलियाचा संघ १९.२ षटकात १२७ धावांवर सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलियाकडून ग्लेन मॅक्सवेलने ४१ चेंडूत ५९ धावांची चांगली खेळी खेळली, पण त्याला विजय मिळवता आला नाही. अफगाणिस्तानकडून गुलबदिन नायबने सर्वाधिक ४ बळी घेतले. याशिवाय नवीन उल हकला ३ विकेट मिळाले. अजमतुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी आणि रशीद खान यांना प्रत्येकी १ विकेट मिळाली.

WhatsApp channel