टी-20 विश्वचषक २०२४ च्या सुपर ८ सामन्यात अफगाणिस्तानने मोठी खळबळ माजवली. त्यांनी रविवारी (२३ जून) ऑस्ट्रेलियाचा २१ धावांनी पराभव केला. ७ वेळा चॅम्पियन असलेला ऑस्ट्रेलियन संघ अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात सुपर फ्लॉप ठरला. या विजयाने अफगाणिस्तानच्या उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा वाढल्या आहेत. आता ऑस्ट्रेलियासाठी परिस्थिती आव्हानात्मक बनली आहे. कारण त्यांचा पुढील सामना भारताविरुद्ध होणार आहे.
वास्तविक अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश आणि भारत हे गट १ मध्ये आहेत. या गटातील गुणतालिकेत भारत अव्वल स्थानी आहे. त्यांनी दोन सामने खेळले आहेत आणि दोन्ही जिंकले आहेत. भारताचे ४ गुण असून पुढील सामना ऑस्ट्रेलियाशी आहे. ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर आहे. उपांत्य फेरी गाठण्यासाठी त्यांना पुढचा सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागेल. त्यामुळे त्यांचा नेट रनरेट सुधारेल.
अफगाणिस्तान सध्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. त्यांनी २ सामने खेळले आहेत आणि १ जिंकला आहे. त्यांचे २ गुण आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे त्यांचा नेट रन रेट मायनसमध्ये आहे. उपांत्य फेरी गाठायची असेल तर पुढचा सामना अफगाणिस्तानला मोठ्या फरकाने जिंकावा लागेल. यासोबतच ऑस्ट्रेलियाच्या पराभवासाठी प्रार्थना करावी लागेल. तर अफगाणिस्तानला बांगलादेशला मोठ्या पराभूत करावे लागेल.
टीम इंडियाची उपांत्य फेरी गाठण्याची ९६.६ टक्के शक्यता आहे. तर ऑस्ट्रेलियाला ५७.३ टक्के संधी आहे. अफगाणिस्तानची शक्यता ३७.५ टक्के आहे. ही टक्केवारी वाढवण्यासाठी अफगाणिस्तानला सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागेल. यासोबतच भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्यास त्यांचा मार्ग सुकर होईल.
अफगाणिस्ताननेही ग्रुप स्टेजमध्येही अप्रतिम कामगिरी केली. हा संघ क गटात होता. अफगाणिस्तानने ४ सामने खेळले आणि ३ जिंकले. त्यांनी युगांडाचा १२५ धावांनी पराभव केला. तर पुढच्या सामन्यात न्यूझीलंडला दणका देण्यात यश मिळवले. अफगाणिस्तानने न्यूझीलंडवर ८४ धावांनी विजय मिळवला होता. यानंतर त्यांनी पीएनजीचाही पराभव केला.
संबंधित बातम्या